आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या भाजी मंडईत संस्कृतमध्ये होतेय भाज्यांची विक्री, पूर्ण मंडईतच संस्कृत भाषेतच व्यवहार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - येथील निशातगंजमध्ये एक अशी भाजी मंडई आहे, जिथे संस्कृत भाषेत भाज्यांची विक्री होतेय. सर्व भाज्यांची नावे संस्कृतमध्ये लिहिलेली आहेत. यासाठी मंडईत जागोजागी बोर्डही लावण्यात आले आहेत. एवढेच नाही, तर सर्व भाजी विक्रेतेही भाज्यांची नावे संस्कृतमध्येच घेतात. 
 
संस्कृतमध्ये का विकताहेत भाज्या...
- निशातगंज गल्ली नंबर 5 मध्ये भाजी विक्रेते सुनील यांनी divyamarathi.com ला सांगितले की, संस्कृत भाषेचा प्रसार करण्यासाठी मंडईतील लोकांनी संस्कृतमध्ये भाज्या विकणे सुरू केले आहे.
- संस्कृत आमची मुख्य भाषा आहे. सरकारने या भाषेसोबत भेदभाव तसेच दुर्लक्षही केले आहे.
- पण ज्या लोकांना संस्कृत येत नाही त्यांचे काय? असे विचारल्यावर भाजी विक्रेते म्हणाले, सर्वांना समजण्यासाठीच हा प्रयत्न आम्ही करतोय. या मार्केटमध्ये रोज भाजी खरेदी करणारे आता संस्कृतमध्ये भाजीचा भाव विचारतात आणि खरेदी करून घेऊन जातात.
- दुसरीकडे या मार्केटमध्ये भाजी विकणाऱ्या सुशीला देवी म्हणतात, आमच्यासारख्या कमी शिकलेल्या लोकांना ही भाषा समजत असेल, तर बुद्धिजीवी लोकांनाही सहज समजेल.
- येथे येणारे ग्राहक आता संस्कृतमध्ये मरिचिक (मिरची), रक्त्वृन्त्कम (टोमॅटो), भिन्दिक (भेंडी), अद्रकम (अद्रक), पटोल (पडवळ), कर्कटी (काकडी), पलांडू (कांदा) आणि निम्बुकम (लिंबू) अशा भाज्या मागताहेत.
 
काय म्हणतात संस्कृत संस्थानचे अधिकारी?
- उत्तर प्रदेश संस्कृत संस्थानचे प्रशासनिक अधिकारी जगदानंद झा म्हणाले की, आमचा हा भाषा वाचवण्याचा एक प्रयत्न आहे. माझ्या घरी पत्नी आणि दोन्ही मुले संस्कृतमध्येच बोलतात. सरकारने संस्कृतसाठी काहीतरी करायला हवे, म्हणजे पुन्हा एकदा सर्वसामान्यांची भाषा संस्कृत होईल.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, मंडईचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...