आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे शाकाहारी मगर, करते मंदिराची रखवाली, पुजारी भरवतात घास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घास भरवताना पुजारी. - Divya Marathi
घास भरवताना पुजारी.
तिरुअनंतपुरम - आपल्‍या देशात अनेक‍ अशी स्‍थळं आहेत की जी विज्ञानासाठी कोडं बनलीत. त्‍यातील काही ठिकाणच्‍या आर्श्‍चयांबाबत स्‍थानिक नागरिकांशिवाय इतर कुणालाच माहिती नाही. ते वाचून, ऐकून, पाहून तुम्‍ही थक्‍क होऊन जाल. अशाच एका आश्‍चर्याबाबत आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत...
केरळच्‍या अनंतपूरमधील कासरगोड येथील एका तलावामध्‍ये एक मंदिर आहे. विशेष म्‍हणजे या मंदिराची देखरेख एक मगर करते. याचे आर्श्‍चय असे आहे की, जर कुण्‍या मगरीचा तलावामध्‍ये मृत्‍यू झाला तर अचानक तिची जागा दुसरी मगर घेते. ती कुठून येते, हे रहस्‍यच आहे. सध्‍या 'बबिआ' नावाची मगर ही जबाबदारी सांभाळत आहे. दोन एकर तलावाच्‍या मधोमध हे भगवान विष्‍णूंचे (भगवान अनंत-पद्मनाभस्वामी) मंदिर आहे. एवढेच नाही तर ही मगर पूर्णपणे शाकाहारी आहे. पुजारी आपल्‍या हाताने तिला प्रसादाचा घास भरवतात.

पुढील स्लाइड्सवर वाचा, पुजाऱ्याच्‍या हाताने प्रसाद खाते शाकाहारी मगर..
बातम्या आणखी आहेत...