आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vehicle Hits Wing Tip Of Air India Plane At Chennai Airport

चहाच्या गाडीला विमानाची धडक; मुंबई-चेन्नई विमानातील प्रवासी बचावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - हवेत विमानाला पक्ष्याची धडक बसल्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. मात्र, लॅँडिंगच्या वेळी विमानतळावरील वाहनाला धडक बसल्याची घटना तशी दुर्मिळ घडते. मुंबईहून आलेल्या विमानाने रविवारी येथील चहापाण्याच्या गाडीला अशीच धडक दिली. सुदैवाने विमानातील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही.

एअर इंडियाचे मुंबईहून आलेले विमान येथील विमानतळावर उतरत असताना विमानाचे एक पाते चहापाण्याच्या गाडीला घासले. मुंबई-चेन्नई एआय 570 विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असून विमानाच्या डाव्या पात्याला काही ओरखडे पडले, अशी माहिती विमानतळ सूत्रांनी दिली.

लॅँडिंगनंतर विमान पार्किंग बेवर जाताना हा अपघात घडला. जेट एअरवेजच्या विमानासाठी अन्नपदार्थ भरण्यासाठी ही गाडी उभी होती. एअर इंडियाच्या अभियंत्यांनी विमानाला कोणताही धोका नसल्याचे प्रमाणपत्र देऊन मुंबईच्या परतीच्या प्रवासासाठी कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. सुरक्षा अधिकार्‍यांनी या प्रकरणाचा तपास केला आणि चहापाण्याच्या वाहनचालकाची चौकशी केली. संबंधित चालकाने गाडी व्यवस्थित उभी केली नसल्याचा आरोप करण्यात आला.