आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Venkaih Naidu Critisized Opposition On Ordinance Issue

विरोधकांचे बोलणे ‘असुराचे प्रवचनच’, अध्यादेशांवरून वेंकय्या नायडू यांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेसच्या काळात अनेक विधेयके मंजूर झाली होती. याचा सोयीस्कर पडल्यामुळेच विरोधक आता आमच्यावरी टीका करू लागले आहेत. त्यांचा उपदेश म्हणजे ‘असुराचे प्रवचनच’ आहेत, असे संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.

जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात ७७, इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात ७७ आणि राजीव गांधी असताना ३५ अध्यादेश काढण्यात आले होते. या गोष्टींचा काँग्रेसला विसर पडला आहे. सातत्याने खोटे बोलून सरकारला बदनाम केले जात आहे. दहा वेळा खोटे बोलले तरी ते सत्य ठरत नाही. खरे ही ‘लोकशाहीची हत्या ’आहे. कृपा करून अगोदर गृहपाठ करून या. त्यानंतरच काँग्रेसने आरोप करावे. तुमचे सरकार असतानाच एक पाहणी झाली होती. त्यात गुजरात मॉडेल देशात सर्वात चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे म्हटले होते, असे नायडू म्हणाले. भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, लोकसभेत बोलताना सोमवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या शेतकरी धोरणावर टीका केली होती. मोदी सरकार सुटाबुटातील आहे, असा आरोप त्यांनी केला होता.