आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेपिस्ट बाबा म्हणाला, माझ्या दुखण्याचा फक्त हनीप्रीतकडेच इलाज आहे, तिला सोबत राहू द्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम रहीम हनीप्रीतसह नेहमी गोव्याला जायचा. - Divya Marathi
राम रहीम हनीप्रीतसह नेहमी गोव्याला जायचा.
पंचकुला/रोहतक - साध्वी बलात्कार प्रकरणात राम रहीम रोहतकच्या सुनारिया जेलमध्ये 20 वर्षांसाठी कैद झाला आहे. तथापि, हा बलात्कारी बाबा नेहमी गोव्याला जात होता, त्याच्यासह हनीप्रीतही असायची. एवढेच नव्हे तर, रेपिस्ट राम रहीम त्याची मानलेली मुलगी हनीप्रीतला जेलमध्येही सोबत ठेवू इच्छित होता.
 
यामुळे सारखा गोव्याला जायचा बाबा...
- बलात्कारी बाबा गुरमित स्वत:चा इलाज गोव्याच्या खासगी हॉस्पिटलमध्ये करत होता. खरेतर त्याच्या गाडीतून जप्त झालेल्या काही डॉक्युमेंट्सवरूनच याचा खुलासा झाला आहे.
- बाबाच्या लक्झरी लेक्सस कारमध्ये मागच्या सीटवर एक मेडिकल प्रिस्क्रिप्शन आढळले. ज्यात गोव्यातील राजगिरी व्हिक्टर हॉस्पिटलचा उल्लेख आहे. 
- या कागदावर गुरमित सिंगचे नाव आणि डॉक्टरांनी त्याच्या लोअर बॅक पेनबद्दल लिहिले आहे. सोबतच 15 दिवसांचा आराम आणि वेदनांपासून मुक्ती मिळण्यासाठी टिप्सही दिलेल्या आहेत.
- असे सांगितले जात आहे की, बलात्कारी बाबा या मेडिकल प्रिस्क्रिप्शनचा आधार घेऊन सरकारला कंबरदुखीचा बहाणा करत होता.
- तथापि, पोलिसांनी त्याची ही मेडिकल चिठ्ठी आपल्या ताब्यात घेतली आहे.
यामुळे हनीप्रीतला सोबत ठेवायचे होते बाबाला
- राम रहीमच्या मते, हनीप्रीत त्याची दत्तक मुलगी आहे. परंतु हनीप्रीत बाबाला कधी मित्र, तर कधी भाऊ म्हणायची.
- बाबाशिवाय अजून कोणीही हे क्लिअर केलेले नाही की, दोघांचे नेमके नाते काय आहे? तथापि, हनीप्रीतच्या पतीने त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप केले आहेत.
- एका चॅनलनुसार, बाबा हनीप्रीतला जेलमध्येही सोबत ठेवू इच्छित होता.
- राम रहीमने जेलच्या अधिकाऱ्यांना सांगितले की माझ्या पाठीत त्रास होतोय, आणि याचा इलाज फक्त हनीप्रीतच करू शकते.
- जेलच्या अधिकाऱ्यांनी बाबाला विचारले की कोणता आजार आहे? तर राम रहीम म्हणाला की, माझी पाठ फक्त हनीप्रीतच चांगली दाबू शकते.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, राम रहीम आणि हनीप्रीतचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...