आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K: विहिंप कार्यकर्त्यांनी जाळला ISIS चा झेंडा; राजौरीत धार्मिक तणाव, कर्फ्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्फ्यूमध्ये पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. - Divya Marathi
कर्फ्यूमध्ये पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दहशतवादी संघटना आयएसआयएसचा झेंडा पेटवून दिल्यानंतर धार्मिक तणाव निर्माण झाला. मंगळवारी येथे कर्फ्यू लावण्यात आला आहे. काही ठिकाणी पोलिसांवरही दगडफेकीच्या घटना झाल्या. परिस्थिती एवढी हातघाईला आली की लष्कराला पाचारण करण्यात आले. अल्पसंख्याक समुदायाचा आरोप आहे, की जाळण्यात आलेल्या झेंड्यावर धार्मिक ओळी लिहिलेल्या होत्या. त्यांनी विहिंप कार्यकर्त्यांच्या अटकेची मागणी केली. उपमुख्यमंत्री निर्मलसिंह यांनी दोन्ही बाजूंना शांततेचे आवाहन केले.
15 अटक
राजौरीच्या जुन्या भागातील नागरिकांनी कर्फ्यूचे उल्लंघन करत पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी लाठीचार्ज करुन दगडफेक करणाऱ्यांना पिटाळून लावले. दुपारनंतर लष्कराला बोलावण्यात आले. त्यांनी शहरातून फ्लॅग मार्च केला. राजौरीच्या जिल्हाधिकारी दीप्ति उप्पल म्हणाल्या, कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्या 15 लोकांना अटक करण्यात आली आहे. शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
विहिंप कार्यकर्त्यांना नाही होणार अटक - उप मुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी विहिंप कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. ते म्हणाले, 'आयएसआयएसचा झेंडा हे दहशतवाद्यांचे प्रतिक आहे. त्यामुळे विहिंपच्या कार्यकर्त्यांना अटक करता येणार नाही. दहशतवादी आणि देशविरोधी शक्तींचा झेंडा जाळणे हे देशभक्तीचे काम आहे.' विहिंपचे म्हणणे आहे, की आम्ही दहशतवादी संघटनेचा झेंडा पेटवून दिला, त्यावर फारसी भाषेत काय लिहिले आहे, याची आम्हाला कल्पना नव्हती.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, आयएसआयएसचा झेंडा जाळतानाचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...