आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम असल्याने सलमानला तातडीने जामीन मिळाला- साध्वी प्राची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहाणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी अभिनेता सलमान खानच्या जामिनावर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील हिट अँड रन प्रकरणी सलमानला झालेल्या पाच वर्षांच्या शिक्षेला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. शुक्रवारी त्याला जामीन मंजूर झाला आहे. यावर साध्वी प्राची यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्या म्हणाल्या, 'सलमान एक 'खान' असल्याने त्याला लवकर जामीन मिळाला आहे. गरीबांना न्यायासाठी ताटकळत राहावे लागते. जर तो खान नसता तर त्याला नक्कीच शिक्षा झाली असती.'
सलमान शुटिंगसाठी काश्मिरला जाणार
मुंबई सेशन्स कोर्टाने हिट अँड रन प्रकरणी सलमानला 6 मे रोजी पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्याला हायकोर्टातून दोन दिवसांचा हंगामी जामीन मंजूर झाला. शुक्रवारी हायकोर्टात झालेल्या सुनावणीत त्याच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आणि त्याचे अपीलही दाखल करुन घेण्यात आले. हायकोर्टाच्या आदेशानुसार सलमान खान सेशन्स कोर्टासमोर शरण आला आणि पाच मिनिटांत जामीन मिळवून सुटकाही करुन घेतली. येत्या 15 जूनरोजी त्याच्या अपीलावर हायकोर्टात सुनावणी सुरु होणार आहे.
दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर सलमान आता त्याच्या चित्रपटांच्या उर्वरित शुटिंगसाठी रवाना होणार आहे. सूत्रांच्या माहितीनूसार तो शनिवारी काश्मीरला रवाना होईल. तिथे बजरंगी भाईजान चित्रपटाचे शुटिंग सुरु आहे. 17 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सलमान परत येत असल्याने चित्रपटाचे युनिट देखील आनंदी आहे.
भाजप खासदार सत्यपालसिंह यांनी देखील घेतला आक्षेप
सलमानला हायकोर्टातून दिलासा मिळाल्यानंतर भाजप खासदार आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपालसिंह यांनी निशाणा साधला आहे. त्यांचा लोकसभा मतदारसंघ बागपत येथे ते म्हणाले, 'सलमानला दिलासामिळाला; पण गरिबांना न्याय मिळाला नाही. दोन दिवसांपासूनची आशा संपली'