आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विहिंप परिक्रमा : मौनी महाराज आश्रमात नजरकैद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेठी - श्री परमहंस आश्रमाचे संत मौनी महाराज व त्यांच्या अनुयायांना मंगळवारी आश्रमात नजरकैद करण्यात आले. मौनी महाराज विहिंपने आयोजित केलेल्या परिक्रमेत भाग घेण्यासाठी अयोध्येला निघाले होते. यादरम्यान त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारने परिक्रमेवर बंदी लादली आहे.


पीठेश्वर मौनी महाराज व 35-40 साधूंना त्यांच्या गौरीगंज येथील आश्रमात नजरकैद करण्यात आले आहे, असे पोलिस उपाधीक्षक पी. मुन्ना लाल यांनी सांगितले. मौनी महाराज यांनी सोमवारी आपण अयोध्येत जाणार असल्याचे जाहीर केले होते. मंगळवारी सकाळी पोलिसांनी त्यांना रोखले. आश्रम परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मौनी महाराज यांनी कारवाईच्या विरोधात आश्रमात आमरण उपोषण सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.