आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारो-दार कपडे विकणा-यांनी सुरू केली कंपनी, लोकांकडून गोळा केले 500 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(एक व्यक्तीचे अनेक रुपे... आत्तापर्यंत अय्यूब अशाप्रकारे रूप बदलूम फिरत होता)

रायपुर - पाच राज्यांमधील गुंतवणूकदारांना 500 कोटींचा गंडा घालणा-या ग्रीन रे इंटरनॅशनल चिटफंड कंपनीच्या एका संचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अय्यूब शाह असे याचे नाव असून, लोकांकड़ून जमवलेल्या पैशातून नायजेरिता व्यवसाय सुरू केल्याची कबुली त्याने पोलिसांत दिली आहे.
ग्रीन रे इंटरनॅशनल चिटफंड कंपनीच्या चारही संचालकांनी घरा-घरात जाऊन कपडे विकण्याचा धंदा सुरू केला होता. परंतु उधारीच्या कारणामुळे त्यांचा हा धंदा चौपट झाला. त्यानंतर ग्रीन रे कंपनीने एक संस्था सुरू केली आणि बघता-बघता ही संस्था करोडोच्या घरात जाऊन पोहचली. राजस्थानमधून दोन दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या संचालक अय्यूब शाह हा कोलकातामार्गे बांग्लादेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. कंपनीचा एक संचालक आणि संपूर्ण ऑर्गेनायझेशनचा मास्टर माइंड मीर शाहीरुद्दीन नायजेरियामध्ये स्थायीक झाला आहे. तर इतर 2 संचालक फरार आहेत. अय्यूबला पकडल्यानंतर चौकशी दरम्यान त्याने स्पष्ट केले की, गरीबांना आकर्षित करणारी स्कीम सांगून आमच्या कंपनीने जो पैसा कमावला,त्याच्या आधारे नायजेरियामध्ये बिजनेस सुरू केला.
पोलिस या प्रकरणी कैद्याच्या प्रत्यार्पणाविषयीच्या कराराचा अभ्यास करत आहेत. तर इतर 2 फरार असलेल्या संचालक खालिक शाह आणि मीर तहरूद्दीन यांचा शोध सुरु आहे. दरम्यान अय्यूब शाह (35) हा राजस्थानमधील अजमेरमध्ये असल्याच्या माहितीवरुन पोलिसांनी सापळा रचून पकडले. शाहा त्याच्या इतर दोन साथीदारांसोबत खालिक शाह आणि मीर तहीरूद्दीन यांच्यासोबत बांग्लादेशात पळून जाण्याच्या तयारीत होतो असे पोलिसांनी सांग़ितले. चौकशी दरम्यान शाहने सांगितले की, रायपुरमध्ये 2009 साली मोतीबागमध्ये ऑफिस सुरु करण्यात आले. तर ओडिसामध्ये 2004 साली कंपनीची सुरुवात करण्यात आली. दरम्यान एप्रिल 2013 मध्ये ओडिसा सरकारने कंपनीच्या मुख्यालयाला सील केले त्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले आणि बाजारात पैसे अडकले. त्यामुळे लोकांनी आमच्याकडे गुंतवलेला पैसा त्यांना परत करणे अवघड झाले त्यामुळे सर्वच संचालक अंडर ग्राउंड झाले.
पुढील स्लाइडवर वाचा, कसे पकडले पोलिसांनी....