आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vicky Donor Buffalo Yuvraj Brother In Animal Fair At Ludhiana Latest News In Marathi

Vicky Donor युवराजचा भाऊ \'बली\', शर्यतीत सगळ्यात पुढे, जिंकले 31 हजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना- पंजाब डेअरी फार्मिंग असोसिएशनने जगराओ येथे आयोजित केलेल्या पशुमेळ्यात हरियाणातील कुरुक्षेत्रमधील करमवीर सिंग यांचा 'विकी डोनर' रेडा युवराज आकर्षणाचा बिंदू ठरला. विकी डोनरचा धाकटा भाऊ 'बली'नेही प्रेक्षकांकडून वाह वाह मिळवली. इतकेच नाही तर बलीने कॉम्पिटीशनमध्ये प्रथम क्रमांक पटकावत 31 हजार रुपयांचे रोख बक्षिस मिळवले. बलीचा मालक अजय सिंगला मानचिन्ह देण्‍यात आले. अजय सिंग पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील रहिवासी आहे. बली हा रेडा मुर्राला जातीचा आहे.

बलीला मिळते व्हीआयपी ट्रीटमेंट
अजय सिंग यांनी सांगितले की, बलीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. त्याची चांगल्याप्रकारे निगा ठेवली जाते. त्याला वेळोवेळी खुराक दिली जाते. तसेच बदलत्या हवामानानुसार पशुवैद्याकडून त्याची तपासणी केली जात असते.

देश-विदेशातील लोक होतात सहभागी...
पंजाब डेअरी फार्मिंग असोसिएशनचे चेअरमन डॉ. जी.एस. कलकट यांनी पशु मेळ्याचे उद्घाटन केले. या दरम्यान कृषी आयुक्त बलविंदर सिंग सिद्धू उपस्थित होते. अजय पाल सिंह ढिल्लो यांनी सांगितले की, पशुमेळ्यासाठी देश-विदेशातील लोक सहभागी होतात. रेड्याची शर्यत लावली जाते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...