आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्ड ड्रिंकमध्ये मिसळली होती दारू, तरूणीने सांगितली 'त्या' रात्रीची कहाणी..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटना घडलेली अपार्टमेंट आणि मेडीकल टेस्टनंतर रूग्णालयातून बाहेर पडताना तरूणी... - Divya Marathi
घटना घडलेली अपार्टमेंट आणि मेडीकल टेस्टनंतर रूग्णालयातून बाहेर पडताना तरूणी...

भागलपूर- येथे 19 नोव्हेंबरच्या रात्री भगवती अपार्टमेंटमध्ये सामुहिक बलात्काराची शिकार झालेली तरूणी शुक्रवारी कोर्टात पोहोचली. तिच्यासोबत आई-वडिल देखील होते. महिला अधिकारी स्वयंप्रभा यांनी पॉक्सो जज चेंबरमध्ये तरूणीला हजर केले. तेथे तिने त्या रात्रीची संपूर्ण कहानी सांगितली...


मनीषने कोल्ड ड्रिंगमध्ये मिसळी दारू...
तरूणीने सांगितले की, ती आपार्टमेंटमधील प्लॅट नंबर 201 मध्ये आपल्या मैत्रीणीला भेटायला गेली होती. मैत्रीणीने तिथे भेटायला बोलवले होते. दरवाजा वाजवल्यानतंर मैत्रीण बाहेर आली तेव्हा ती तिथून परत पायऱ्यांवरून उतरून परत निघाली. तेवढ्यात मनीषने तिला थांबवले आणि लगेच मैत्रीण येणार आहे, असे सांगितले. त्याने तिला गोल्ड्रींग पिण्यासाठी दिले. त्यानंतर मनीषने खोली बंद करून घेतली. तिथे त्याच्या आत्त्याचा मुलगा सन्नी देखील होता. मनीषने दिलेल्या कोल्ड्रींकमध्ये दारू मिसळलेली होती. त्यामुळे तरूणीला नशा चढली. याचा फायदा घेऊन दोघांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. तिने आरडाओरड सुरू केली, तेव्हा त्यांनी तिला मारहाण केली आणि तिचा चेहरा आणि शरिर ओरबाडून काढले. यामुळे ती जखमी झाली. कशीतरी त्यांच्या ताडीतून सुटका करून बाहेर येऊन तिने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून अपार्टमेंटमधील लोक जमा झाले. तोपर्यंत मनीष बाइक स्टार्ट करून पळून गेला होता. त्याच्या नंतर सन्नीही पळून गेला. अर्ध्यातासानंतर पोलिस तिथे पोहोचले.


आई-वडिलांसोबत राहाचे आहे....
कोर्टात चौकशी केल्यानंतर दोन वाजेला ती बाहेर आल्यानंतर आई-वडिलांना भेटली. तिने आपल्या आई वडिलांना घडलेल्या घटनेविषयी सांगितले आणि आपल्याला आई-वडिलांसोबत रहाचे आहे असे पोलिसांना सांगितले. पोलिस कर्मचाऱ्यानी तिला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हॉस्पीटलमधून सुटका होताच आई-वडिलांकडे पाठवण्यात येईले आश्वासन पोलिसांनी तिला दिले. सुरूवातील जवळपास तीन पानांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर हा जबाब सीलबंद करून सीजेएम कार्यालयात पाठवण्यात आला. तेथून तो लिफाफा पॉक्सो कोर्टात पाठवण्यात आला.

 

आधी मेडिकल बोर्डाने सांगितले रेप झाला नाही, नंतर म्हणाले शक्यता आहे...
19 नोव्हेंबरला घटनेच्या दूसऱ्या दिवशी मायागंज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तरूणीची मेडिकल टेस्ट केली आणि रिपोर्टमध्ये रेप झाला नाही असे लिहिले. रिपोर्ट आल्यानंतप दोन दिवसांनी मेडिकल बोर्डाने पुन्हा मुलीची टेस्ट केली, तेव्हा बलात्कार झाल्याची शक्यता असल्याचे म्हटले. एकच केसमध्ये दोन रिपोर्ट आल्याने हॉस्पिटलच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण कऱण्यात येत आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...