आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिपुरमध्ये हाहाकार,काही मिनिटांत वाहून गेले पूल आणि घरे, समोर आला VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मणिपुरमध्ये मुसळधार पावसामुळे उडालेल्या हाहाकाराचा व्हिडिओ पाहाण्यासाठी क्लिक करा)

नवी दिल्ली- मणिपूर-म्यानमार बॉर्डरवर शनिवार सायंकाळी चंदेल जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. चौउमोल गावात अनेक घरे कोसळले असून शेकडो लोकांना बेघर व्हावे लागले आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे काही मिनिटांत नदीवरील पुल आणि अनेक घरे वाहून गेले आहेत.

गृहमंत्र्यांनी साधला मुख्यमंत्र्यासोबत संवाद...
मुसळधार पावसामुळे उद्‍भवलेल्या पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मणिपूरला मदतीचे आश्वासन दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री ओक्रम इबोबी सिंग यांच्याशी फोनवरून संवाद साधून राज्यातून पूरस्थितीचा आढावा घेतला.

एनडीआरएफकडून युद्धपातळीवर मदतकार्य
भूस्खलनाच्या घटनेनंतर केंद्र सरकारने एनडीआरएफचे पथक मणिपूरमध्ये पाठवले आहे. मणिपूरमध्ये मुसळधार पावसामुळे चंदेल जिल्ह्यात भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ढिगार्‍याखाली शेकडो लोक गाडले गेल्याची भीती देखील वर्तवली जात आहे. एनडीआरएफचे जवान युद्धपातळीवर ढिगारा उपसण्याचे काम करत आहेत. राज्यातील डझणभर पूल वाहून गेले आहेत.

सोनिया गांधींनी घेतला पूरस्थितीचा आढावा
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष सोनिया गांधी यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री ओक्रम इबोबी सिंग यांच्यासोबत संवाद साधून राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला.

म्यानमारमध्येही जनजीवन विस्कळीत..
मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे म्यानमार येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाने आतापर्यंत 27 जणांचा बळी घेतला आहे. तसेच एक लाखाहून जास्त लोकांना पावसाचा फटका बसला आहे.

जोरदार पावसामुळे 12 राज्यांतील 42 शहरांमधील एक लाख 14 हजार 845 लोक पूरस्थितीमुळे प्रभावित झाले आहेत. शेकडो घरे, रेल्वे ट्रॅक, रस्ते आणि पुल वाहून गेल्याची माहिती सरकारी न्यूज एजेंसी शिन्हुआ ने दिली आहे.

मणिपूरमधील अयेयावाडी, चिंदविन, थानल्विन, सित्तोंग आणि नगवुन या प्रमुख पाच नद्या दुथळी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून छायाचित्रांतून पाहा, मणिपूरमधील पूरसदृश्य स्थिती...
बातम्या आणखी आहेत...