आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडबरोबर सेक्स करून बनवला Video,मित्रांनी केला व्हायरल, तरुणाची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायगड - छत्तीसगड येथील रायगड जिल्ह्याच्या कुकुर्दामध्ये एका 18 वर्षांच्या मुलाने गर्लफ्रेंडबरोबर सेक्सचा व्हिडीओ तयार केला. तो त्याने मित्रांबरोबरही शेअर केला. पण त्याच मित्रांनी त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दबाव वाढला तर मुलाने विष घेऊन आत्महत्या केली. त्याने सुसाइड नोट लिहिले आहे, त्यात शेजारच्या गावातील तीन तरुण या संपूर्ण प्रकारासाठी जबाबदार असल्याचे लिहिले आहे.

श्रीमंत कुटुंबातील तरुणी
- आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव संजीव कालो आहे. त्याचे शेजारी राहणाऱ्या एका तरुणीबरोबर अफेअर सुरू होते.
- ही तरुणी श्रीमंत कुटुंबातील होती. तिचे कुटुंबीय त्यांच्या नात्याच्या विरोधात होते. संजीवने काही दिवसांपूर्वी त्यांच्या खासगी क्षणांचा व्हिडीओ तयार केला होता.
- त्याने मित्रांना तो दाखवला. सुसाइड नोटनुसार मित्रांनी मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावला आणि ती व्हिडीओ क्लिप कॉपी करून घेतली.
- त्यांनी ही क्लिप इतरांनाही शेअर केली. व्हिडीओ शेअर करण्याची धमकी देत ते संजीवकडे पैसे मागू लागले.

तरुणीच्या कुटुंबीयांनी केली होती तक्रार
- दरम्यान तरुणीच्या कुटुंबीयांना या गोष्टीची चुणूक लागली तेव्हा संजीवच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली.
- संजीवच्या विरोधात बलात्कार, धमकी देऊन पैसे मागणे आणि अश्लिल व्हिडीओ तयार करण्याबाबत तक्रार दाखल केली.

भाऊ म्हणाला जीवाला धोका..
- अनेक दिवसांपासून संजीव खूप तणावात होता. तो कुटुंबीयांना त्याच्या जीवाला धोका असल्याचे सांगत होता.
- मृताचा भाऊ कमलेशने सांगितले की, त्याचे मित्र सारखे त्याच्याकडे पैसे मागत होते. त्याच तणावात त्याने आत्महत्या केली.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, व्हिडीओची भिती दाखवून मित्र करत होते Blackmail...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...