आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पलंगावर वेश्या तर पलंगाखाली जागृत मातृत्व, When Varanasi Speaks...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ म्हणून चर्चेत आलेल्या वाराणसीचा वेगळा चेहरा दाखवणारा एक व्हिडीओ नुकताच यूट्यूबवर अपलोड करण्यात आला असून समाजातील अत्यंत जळजळीत वास्तव या व्हिडीओच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. देवभूमी किंवा देवाची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहरामध्ये देहव्यापारासाठी लहान मुलींना कसे अडकवले जाते किंवा मानवी तस्करीच्या माध्यमातून लहान मुलींना कसे वेश्याव्यवसायाकडे ढकलले जाते हे या व्हिडीओतून दाखवण्यात आले आहे.

वेश्याव्यवसायात अडकलेल्या मुलींना सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या गुडिया नावाच्या एका संस्थेच्या डॉक्युमेंटरीचा हा व्हिडीओ आहे. ही संस्था वाराणसीमध्ये काम करते. अजित आणि मंजू सिंह यांनी समाजकार्याचाहा वसा हाती घेतला आहे. संस्थेबाबतच्या या डॉक्युमेंटरीमध्ये त्यांनी वाराणसीचा दुसरा चेहरा समोर आणला आहे. तसेच व्यवस्थेवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे. या व्हिडीओमध्ये काही मुली, तरुणींची संघर्षगाथा मांडली आहे, तसेच मुली या गोरखधंद्यात कशा अडकतात आणि संस्था त्यांची मदत कशी करते हे सांगण्यात आले आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, संस्थेने सोडवलेल्या मुलींची आपबिती आणि एकूणच वाराणसीतील परिस्थिती..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...