आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभांमध्ये महिलांना सर्वाधिक प्रतिनिधित्व बिहार, राजस्थानात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन महत्त्वाच्या पदांवर महिला असूनही देशातील महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याबाबत पंधराव्या लोकसभेतही एकमत होऊ शकले नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेच्या सभापती मीरा कुमार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज असूनही महिला आरक्षण विधेयक पारित होऊ शकले नाही. राज्यसभेत हे विधेयक पारित झाले आहे. गेल्या 18 वर्षांपासून या विधेयकाचे भिजत घोंगडे आहे. विधानसभा आणि संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात या विधेयकाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अशा वेळी देशभरात किती महिला खासदार आणि आमदार आहेत हे पाहणे रंजक ठरेल.