आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्या बालनने घेतली CM शिवराज यांची भेट; साडी, शॉल देऊन केला सन्मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - रविवारी प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन आणि निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट एका कार्यक्रमासाठी भोपाळमध्ये आले होते. त्यानिमित्त काही तास ते शहरामध्ये होते. यादरम्यान त्यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची भेटही घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी साधना सिंहदेखिल त्यांच्याबरोबर होत्या. महेश भट्ट, विद्या बालन आणि शिवराज सिंह यांनी बराच वेळ चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्याला साडी आणि शॉल भेट म्हणून दिली.

यावेळी महेश भट्ट यांनी सांगितले की, मी या शहरात बऱ्याचदा येत असतो. विशेषतछ जहानुमा पॅलेसमध्ये मी थांबत असतो. या शहराचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे. ते आजही स्पष्ट जाणवते. सध्या या शहराबाबत प्रोजेक्ट डोक्यात नाही. पण येथील सरकारने जी आशा जागवली आहे, ती पाहता शहराचे भविष्य उज्ज्वल असल्याचे दिसते. आगामी काळात मी याठिकाणी प्रोजेक्ट घेऊन येऊ शकतो, असे ते म्हणाले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, विद्या बालन आणि महेश भट्ट यांचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...