आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठुआत सीमेवर 3 दहशतवादी दिसल्यानंतर सतर्कतेचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील सीमेजवळ तीन सशस्त्र दहशतवादी दिसल्यानंतर सतर्कतेचा इशारा देण्यात आला. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ हिरानगर परिसरात ते दिसून आले. 
 
सुरक्षा दलांनी घेराव टाकून शोधमोहीम राबवली. कठुआ येथे घुसखोरी करणाऱ्या काही दहशतवाद्यांनी हल्ले घडवले होते. २०१५ मध्ये सैन्याच्या गणवेशात दहशतवाद्यांनी कठुआ महामार्गावरील पोलिस ठाण्यावर हल्ला केला होता. यात ५ जणांचा मृत्यू झाला होता.  

खीर भवानी यात्रेसाठी सुरक्षेची मागणी  
खोऱ्यातील हिंसा पाहता काश्मिरी पंडितांनी खीर भवानी जत्रेसाठीदेखील अमरनाथसारख्या सुरक्षेची मागणी केली आहे. यात्रेशी संबंधित मंडळाने म्हटले आहे की,  जम्मू ते गांदरबल (खीर भवानी) दरम्यान गाड्यांना सुरक्षा देण्यात यावी. या यात्रेसाठी दरवर्षी मोठ्या संख्येने काश्मीरी पंडित येतात. गेल्या वर्षी ४० हजार, २०१५ मध्ये ३० हजार आणि २०१४ मध्ये ६० हजार लोक दर्शनासाठी गेले होते.
बातम्या आणखी आहेत...