आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाड प्रकरण: विकास-आशिषला दोन दिवसांची पोलिस कोठडी, वडील म्हणाले- तपासात पूर्ण सहकार्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विकासला बुधवारी अटक करण्यात आली. - Divya Marathi
विकासला बुधवारी अटक करण्यात आली.
पानीपत/चंदीगड - चंदीगडमध्ये आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीची छेड काढणाऱ्या मुख्य आरोपी विकास बराला याला गुरुवारी चंदीगड कोर्टात हजर करण्यात आले. विकासला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विकास आणि त्याचा मित्र आशिष कुमार या दोघांना बुधवारी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर झालेल्या चौकशीत हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्षांचा मुलगा विकास बराला याने वर्णिका कुंडू हिच्या कारचा पाठलाग केल्याचे मान्य केले आहे. वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. या प्रकरणी डीजीपी तेंजेंदर लूथरा म्हणाले, दोघांना पोलिस कोठडी मागण्यात आली आहे. त्यांना घटनास्थळी नेऊन सीन ऑफ क्राइम पुन्हा एकदा केला जाईल. तपासा संदर्भातील अधिक माहिती देण्यास लूथरा यांनी नकार दिला. 
 
हरियाणा भाजप प्रमुखांचा मुलगा आहे विकास 
- विकास आणि त्याचा मित्र आशिष याच्या विरोधात अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अजमानीपात्र कलामांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी त्याला समन्स बजावून बुधवारी चौकशीसाठी पोलिस स्टेशनला हजर राहाण्यास सांगण्यात आले होते. विकासने समन्स स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा त्याच्या दारावर ते चिकटवण्यात आले होते.
 
कोण आहेत आरोपी 
- आरोपी विकास बराला हा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) हरियाणा प्रमुख सुभाष बराला यांचा मुलगा आहे. 
- हरियाणा भाजप प्रमुख सुभाष बराला यांचा मुलगा आहे. त्यांनी तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. 
- पीडित तरुणी ही आयएएस अधिकाऱ्याची मुलगी आहे. या घटनेनंतर तिने फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते, की मी आयएएस अधिकाऱ्याची मुलगी असल्यामुळे वाचले. मी सर्वसाधारण तरुणी असते तर कदाचित माझे अपहरण झाले असते. 
 
काय आहे प्रकरण 
शुक्रवारी रात्री साधारण 11-12 वाजता चंदीगडमध्ये एक तरुणी तिच्या कारने प्रवास करत होती. त्यावेळी दोन तरुण तिचा पिच्छा करत होते. त्यांनी तिच्या कार समोर आपली कार आडवी करत तिचा रस्ता अडवला. तिला कारमधून बाहेर काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तिने जेव्हा कारचे दार आणि खिडकी उघडली नाही तेव्हा काच फोडण्याचा प्रयत्न केला. तरुणीने तत्काळ पोलिसांना फोन केला आणि पोलिसही वेळेवर पोहोचल्यामुळे पुढील अनर्थ टळल्याचे तरुणीने सांगितले. मदतीसाठी पोहोचलेल्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांना अटक केली. दुसऱ्या दिवशी जामीनावर त्यांना सोडून देण्यात आले होते.  
बातम्या आणखी आहेत...