आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Village In Rajasthan Proving To Be Ideal To Save Female Foetus

मुलीच्या जन्मानंतर 111 झाडे लावण्याची अनोखी परंपरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी राजस्थानातील एका गावाने समाजासमोर आदर्श घालून दिला आहे. पिपलांत्री गावात मुलीचा जन्म झाल्यानंतर 111 रोपटे लावण्याची परंपरा आहे. ग्रामपंचायतीने सहा वर्षांपूर्वी ठरावाद्वारे हा नियम लागू केला होता. हा नियम आता ग्रामस्थांच्या सामान्य सवयीमध्ये परिवर्तित झाला आहे.

राजसमंद जिल्ह्यातील या गावात गेल्या सहा वर्षांत 2.52 लाख झाडे चराई पट्ट्यात लावण्यात आली आहे. झाडांच्या संरक्षणाचीही ग्रामपंचायतीमार्फत काळजी घेण्यात येत आहे. झाडांना किडीचा त्रास होऊ नये म्हणून जवळ काही काटेरी वनस्पती लावण्यात आल्या आहेत. या वनस्पतींची संख्या अधिक असल्याने त्यापासून ज्यूस काढण्याचा उद्योगही सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती माजी सरपंच शामसुंदर यांनी दिली. त्यातून मिळणार्‍या गावातील लोकांना उत्पन्नाचे नवीन साधन सापडले आहे.

विकासाच्या वाटेवर
पिपलांत्री गावात जवळपास सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. ग्रामपंचायतीमध्ये एसी, एलसीडीची सुविधा आहे. ग्रामसभेला शंभर टक्के उपस्थिती असणारी ही राज्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत आहे.

मुलांसाठी सौर आकाशपाळणे
गावाला वीज आणि पाण्याविषयी स्वावलंबन मिळावे यासाठी शाळांमध्ये सौर आकाशपाळणे लावण्यात आले आहेत. त्याला गो राउंड पंपदेखील म्हटले जाते. पाण्याचा हा पंप आकाशपाळण्याला जोडण्यात आला आहे. मुले हा पाळणा खेळतात. तेव्हा पाणी आपोआप टाकीत भरले जाते.

वेबसाइटवर मार्केटिंग
ग्रामपंचायतीने मार्केटिंगसाठी www.piplntri.com अशी वेबसाइट तयार केली आहे. त्यातून अ‍ॅलोव्हिराच्या उत्पादनाचे मार्केटिंगच नव्हे तर ग्रामपंचायतीमध्ये होणार्‍या प्रत्येक निर्णयाची माहिती त्यावर उपलब्ध करून दिली जाते.

ज्यूस, क्रीम आणि जेलमधून कमाई
ग्रामपंचायतीने गावातच रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून अ‍ॅलोव्हेराचे व्यावसायिकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय ज्यूस, क्रीम, जेली आणि लोणच्याचे उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. त्यातून मिळणारे पैसे गावाच्या विकासात लावले जातात. अनेक कुटुंबांचाही उदरनिर्वाह त्यावर सुरू आहे. यातून ग्रामस्थांना कर्ज सुविधादेखील उपलब्ध करून दिली जात आहे.