आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणात सातवर्षीय मुलीला छेडणाऱ्या दुकानदाराला मारले ५ जोडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुलां (फतेहाबाद) - हरियाणात सात वर्षाच्या चिमुकल्या मुलीची छेड काढणाऱ्या दुकानदार आरोपीला गाव पंचायतीने चांगलीच अद्दल घडवली. त्याला या दुष्कृत्यासाठी भर पंचायतीत पाच जोडे मारण्याचे फर्मान पंचांनी दिले. त्याचबरोबर यापुढे वर्षभर तो व्यापारी सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी होऊ शकणार नाही. इतकेच नव्हे तर स्वत:च्या दुकानातही बसू शकणार नाही. एक लहान मुलगी चॉकलेट घेण्यासाठी दुकानात आली असता या नराधमाने तिची छेड काढली. मुलगी रडत घरी गेली तेव्हा या प्रकाराचा उलगडा झाला. पीडित मुलीच्या पित्याने शिक्षेबाबत नाराजी व्यक्त केली. पण काही लोकांच्या दबावापुढे झुकावे लागल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे या घटनेबाबत पोलिसही अनभिज्ञ आहेत. आरोप सिद्ध झाले असते तर आरोपीला तीन वर्षे शिक्षा झाली असती.