आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Villagers Angry Over Conversion Attack Church, Break House In Jharkhand

धर्मांतराविरोधातील लोकांनी केली घरांची तोडफोड, गावात कर्फ्यूसारखी परिस्थिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची/ इटकी (झारखंड) - झारखंडची राजधानी रांचीपासून जवळपास 30 किलोमीटर दूर बिंधानी गावात रविवारी एका चर्चची तोडफोड करण्यात आली आणि धर्म प्रसारकांना बांधून ठेवण्यात आल्याची घटना घडली आहे. आता या भागात तणावपूर्ण वातावरण असून कर्फ्यूसारखी स्थिती आहे. पोलिसांनी गावात गस्त वाढविली आहे.
काय आहे प्रकरण
रांची जिल्ह्यातील इटकी ब्लॉकमधील बिंधानी गावात रविवारी ख्रिश्चन धर्म प्रसारकांनी चंगाई सभेचे (प्रार्थनेद्वारे रोग बरे करणे) आयोजन केले होते. त्यासाठी गावातील 20-25 लोक एका घरात जमा झाले होते. विजेच्या खांबावरुन पडून अपंग झालेल्या मंगरा उराव नावाच्या एका व्यक्तीसाठी येथे प्रार्थना केली जात होती. ही बातमी गावात पसरल्यानंतर आसपासच्या दोन तीन गावातील लोक लाठ्या - काठ्या आणि मिळेल ते शस्त्र घेऊन त्या घरावर चाल करुन गेले. त्यांनी चंगाई सभेला आयोजित लोकांवर हल्ला केला. त्यांनतर संतप्त जमावाने गावातील चर्चवर देखील हल्ला केला आणि त्याची मोडतोड केली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर इटकीचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि गावकर्‍यांनी बांधून ठेवलेल्या लोकांना मुक्त केले. गावकर्‍यांचा आरोप आहे, की चंगाई सभेत रोग बरे करण्याच्या बहाण्याने लोकांना प्रलोभन देऊन त्यांचे धर्मांतर केले जात होते. हे गेल्या 15 दिवसांपासून सुरु आहे.

(छायाचित्र - बिंधानी गावात नवनिर्मीत चर्चला घेराव घातलेले गावकरी )