आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Villagers Collects 5 5 Rupees For School, Tribal Initiative In Chhatisgarh

गावक-यांनी 5-5 रुपये गोळा करून शाळा सुरू केली..!,छत्तीसगडमधील आदिवासींचा उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जशपूरनगर (छत्तीसगड) - आदिवासी प्रदेशातही शिक्षणाचे महत्त्व पटू लागले आहे. बह्मणी गाव त्याचा वस्तुपाठ ठरावा. सरकारी शाळेच्या कारभाराला वैतागलेल्या गावक-यांनी पदरमोड केली आणि पाच-पाच रुपये वर्गणी गोळा करून स्वत :ची प्राथमिक शाळा सुरू केली. त्यामुळे गरीब मुलांना गावातच शिक्षणाचे दार पुन्हा उघडले.
बह्मणी हेआदिवासी प्रदेशातील दुर्गम गाव आहे. जशपूरपासून 70 किलोमीटर अंतरावरील वनक्षेत्रात येते. तेथे जाणारी वाट अतिशय आडवळणाची आहे. डोंगरांच्या मध्यभागी वसलेले हे गाव. गावात 2008 मध्ये सरकारी प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. तेव्हा लोकांना गावातील मुलांना शिक्षणाची संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु शाळा तर सुरू झाली. मात्र शिक्षक उपलब्ध झाले नाहीत. नियुक्ती दोन शिक्षकांची होती. त्यापैकी एका शिक्षकाला तर गावक-यांनी अद्याप पाहिलेदेखील नाही. त्यामुळे अर्थातच गावकरी नाराज झाले. त्यांनी जिल्हाधिका-यांपासून मंत्र्यांपर्यंत प्रत्येकाकडे कैफियत मांडली. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु आदिवासी गप्प राहिले नाहीत. त्यांनी बैठक घेतली. नेमकी समस्या काय आहे, हे जाणून घेतले आणि स्वत:ची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
केवळ 1500 रू. वर शाळा चालते
शिक्षण विभागाच्या दोन शिक्षकी प्राथमिक शाळा प्रशासनानुसार शाळा चालवण्यासाठी दरवर्षी दोन ते अडीच लाख रुपये खर्च येतो. गावातील एनजीओ रुरल एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने मुलांना दर महिन्याला बिस्किट आणि इतर खाद्य-पदार्थासाठी एक हजार रुपये महिन्याला देण्यात येतात. अशा पद्धतीने महिन्याला 1500 रुपयांत गावकरी शाळा चालवतात. जर एखाद्या महिन्यात शाळेचा खर्च वाढला तर बैठकीत त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जातो.
तीन वर्षांपासून अखंड : आदिवासींनी पदरमोड करून सुरू केलेली शाळा गेल्या तीन वर्षांपासून विनाअडथळा सुरू आहे. 2008 मध्ये सुरू झालेली सरकारी शाळा केवळ मध्यान्ह भोजनापुरती राहिली आहे. तेथे अध्यापन होत नसल्याची तक्रार वाढल्यानेच गावक-यांच्या पुढाकारातून सुरू झालेली शाळा यशस्वीपणे वाटचाल करत आहे.
शिक्षणाची तळमळ
आदिवासी गावात आपल्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी गावक-यांमध्ये प्रचंड
तळमळ पाहायला मिळाली. म्हणूनच स्वत:ची शाळा सुरू करण्यासाठी त्यांनी प्रत्येक घरातून 5-5 रुपये वर्गणी गोळा केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.