आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Villagers Fired The Bus Of Asaram Trust After Argument

PHOTOS: गावक-यांनी जाळली आसाराम ट्रस्टची बस, दगडफेकीत 20 जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - गजपूर येथे गावक-यांनी जाळलेली बस.

गजपूर (राजसमंद) - राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यात आसाराम समर्थक आणि गावक-यांमध्ये झालेल्या वादानंतर पिरसक्षेत्रमध्ये तणाव पसरला आहे. खबरदारी म्हणून परिसरात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
राजसमंद-कुंभलगढ़ मार्गावरील राजनगरच्या सापोल गावात रविवारी सकाळी आसाराम समर्थक आणि राजपूत समुदायाच्या नागरिकांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर संतप्त गावक-यांनी आसाराम ट्रस्टच्या एक बसची तोडफोड करून ती जाळून टाकली होती. दोन्ही बाजुने यावेळी मोठ्या प्रमाणावर दगडफेड झाली. त्यात सुमारे वीस लोक जखमी झाले होते.

काय आहे प्रकरण?
आसाराम समर्थक राजसमंदमध्ये संकिर्तन यात्रेनंतर खारंडिया गावात जात होते. रस्त्यात ठेवलेले पाण्याचे ड्रम हटवण्याच्या मुद्यावरून राजपूत समुदायाचे नागरिक आणि आसाराम समर्थकांमध्ये वाद झाला होता. यादरम्यान काही लोकांनी आसाराम बापुंसंदर्भात वक्तव्य केले. त्यामुळे समर्थक चिडले. त्यानंतर दोन्ह बाजुने मोठ्या प्रमाणावर दगडफेक सुरू झाली. त्यानंतर आसाराम समर्थक बसमध्ये बसून खारंडियाहून कुंभलगढकडे पळून गेले. काही गावक-यांनी बसचा पाठलाग केला. त्यानंतर सापोलमध्ये बस पंक्चर झाली. पाठलाग करणा-या संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक करत बसला आग लावली.

पुढील स्लाइडवर पाहा, घटनास्थळाचे PHOTO