आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Villagers Gifted Car To Principal For 100 Percent Result

बारावीचा निकाल 100% लागल्याने गावकऱ्यांनी दिली मुख्यध्यापकाला GIFT केली कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीकर - राजकीय उच्च माध्यमिक विद्यालय, ढांढणमध्ये तीन वर्षांपूर्वी केवळ 325 विद्यार्थी होते आणि तेथील निकाल साधारणतः 80 ते 90 टक्क्यांदरम्यान होता. मात्र 2011 मध्ये आलेल्या मुख्यध्यापकामुळे या शाळेने यशाचे उच्चांक गाठले. आता येथील विद्यार्थ्यांची संख्या 1150 एवढी झाली आहे. स रकारकडून शिक्षण मिळाले नाही तर मुख्यध्यापकाने करारावर शिक्षक नेमले आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेप्रमाणे येण्याजाण्यासाठी वाहनांचीही व्यवस्था केली आहे. याचा परिणाम म्हणजे विज्ञान आणि कला या विषयांमधील निकाल हा 100 टक्क्यांवर पोहोचला आहे.
तीन वर्षापूर्वी आले होते
गावकरी याचे सर्व श्रेय मुख्यध्यापक भागीरथ मल महिचा यांना देतात. रविवारी त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या शिक्षक सन्मान कार्यक्रमात भेटवस्तूंचा पाऊस पडला. मुख्यध्यापकांना गावकर्‍यांनी अल्टो कार आणि तीन वर्षांचे पेट्रोल आणि दुरूस्ती खर्च दिला आहे. तर इतर 22 शिक्षकांच्या सन्मानार्थ 40 ग्रॅम चांदीचे मेडल देण्यात आले. गावाचे सरपंच जगदीश प्रसाद शर्मा म्हणाले की, या शाळेची ओळख फार जुनी आहे. मात्र तीन वर्षापूर्वी आलेले मुख्यध्यापक भागीरथ मल महिचाने असे काही प्रयोग केले की येथील शिक्षणाचा स्तरच उचंवला आहे. हा सर्व बदल रात्रीचा वर्ग, सरकारी शाळेत हॉस्टेलसारख्या सुविधांमुळे होऊ शकला आहे.
मुलांसाठी शाळेतच सुरू केले हॉस्टेल
या शाळेत रात्रीचे वर्गसुध्दा भरतात. सरकारी शाळा असूनही येथे हॉस्टेलची सुविधा आहे, यामध्ये केवळ डायट शुल्क देण्यात येते. राज्य सरकारच्या धोरणामुळे शाळेत शिक्षक कमी आहेत. मात्र मुलांना शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून गावकर्‍यांनी गावस्तरावर सहा शिक्षक करारावर ठेवले आहेत. यांना दरवर्षी सात लाख रुपये एवढे वेतन गावकरी आणि ढांढण विकास ट्रस्टमार्फत दिला जातो. मागील चार वर्षांपासून या शालेचा निकाल सर्वोत्कृष्ट असा आहे. गावकर्‍यांनी जवळपासच्या गावातून मुले आणण्यासाठी जीप, ऑटोरिक्षा इत्यादींची व्यवस्था केली आहे.
विज्ञान - कला विषयामधील मागील दोन वर्षांचे निकाल
12वी विज्ञान 2014 मध्ये 99%, तर 2013 मध्ये 100% निकाल
12वी कला 2014 मध्ये 100%, तर 2013 मध्येही 100% निकाल

मुख्यध्यापक सुरूवातीला इतिहास वाचतात त्यानंतरच शिकवतात
शाळेत इतिहासाला शिक्षक नाही. त्यामुळे अर्थशास्त्राचे शिकवत असलेले मुख्यध्यापक सुरूवातीला स्वतः इतिहास विषय वाचून घेतात आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवतात.

पुढील स्लाईडवर पाहा, गावकऱ्यांनी अशा प्रकारे केला शिक्षकांचा आणि मुख्यध्यापकाचा गौरव