आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लालच बुरी बलाः अफवा पसरली जमिनीत सोने गाडले आहे, ग्रामस्थांनी अख्खे गाव खोदले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गावातील बायकाही खोदकामात मागे नव्हत्या. त्याही ठिकठिकाणी खोदकाम करताना दिसून येत होत्या. - Divya Marathi
गावातील बायकाही खोदकामात मागे नव्हत्या. त्याही ठिकठिकाणी खोदकाम करताना दिसून येत होत्या.
मालपुरा (राजस्थान)- टोंक येथील मालपुरा परिसरात सोन्याची नाणी सापडल्याची अफवा अगदी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर ग्रामस्थ हातात सब्बल, पावडे, कुदळ घेऊन गोळा झाले. सर्वांनी मिळून गावात ठिकठिकाणी खोदकाम केले. त्यांनी चक्क गावच खोदून काढले. पण हाती काही आले नाही. तरीही ग्रामस्थांचे खोदकाम काही थांबले नाही. अखेर पोलिसांनी लाठिमार करत लोकांना गावातून बाहेर काढले. केवळ सोन्याच्या हव्यासापोटी ग्रामस्थांनी संपूर्ण गावाची वाट लावली.
असे आहे संपूर्ण प्रकरण
- मालपुरा येथील जानकीपुराच्या दबेडिया नाडी येथे तीन दिवसांपूर्वी सोन्याची नाणी सापडल्याची चर्चा गावात पसरली होती.
- या ठिकाणी आणखी सोन्याची नाणी आहेत. इतरही धन गाडले आहे, अशी अफवा त्यानंतर पसरली.
- त्यानंतर या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी लोकांनी अगदी रांगा लावल्या.
- केवळ जानकीपुराच नव्हे तर जवळपासच्या लोकांनाही येथे येऊन खोदकाम केले. पण हाती निराशाच लागली.
मिळाले नाही सोने
- गेल्या तीन दिवसांपासून गावातील लोक ठिकठिकाणी खोदकाम करत आहेत. पण त्यांच्या हाती काही लागले नाही. उलट संपूर्ण गावातच जागोजागी खड्डे झाले.
- बुधवारी रात्री एका व्यक्तीने येथील माती ट्रॅक्टरच्या माध्यमातून दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला. त्याला ग्रामस्थांनी विरोध केला.
- संघर्षाचे वातावरण तयार झाल्याने पोलिस गावात दाखल झाले. त्यांनी खोदकाम थांबवेल. लोकांना पळवून लावले.
- सुमारे तासभर थांबल्यानंतर पोलिस निघून गेले. त्यानंतर ग्रामस्थांनी पुन्हा खोदकाम सुरु केले.
पुढील स्लाईडवर बघा, ग्रामस्थांनी कसे खोदून काढले आपलेच गाव....
बातम्या आणखी आहेत...