आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिरासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, \'लॉलीपॉप\' दाखवू नका, BJPला घरचा आहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या मुद्द्यावरून आतापासूनच वातावरण तापतांंना दिसत आहे. भाजपचे खासदार आणि विश्व हिंदू परिषदेचे (व्ह‍िएचपी) नेते विनय कटियार यांनी राम मंदिर आणि अयोध्येत रामायण संग्रहालय बांधण्याच्या मुद्द्यावरून भाजपला घरचा आहेर दिला आहे.

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवा, रामायण संग्रहालय बांधण्याचा 'लॉलीपॉप' दाखवून काहीच होणार नसल्याचा टोलाही कटियार यांनी लगावला आहे.

दरम्यान, मंगळवारी केंद्रीय मंत्री महेश शर्मा अयोध्यात होते. शर्मा यांनी प्रस्तावित रामायण संग्रहालयाच्या जागेची पाहाणी केली

कटियार म्हणले- महंत मला विचारतात राम मंदिर केव्हा बनेल....
- राज्‍यसभेचे सदस्य विनय कटियार म्हणाले, 'मी अयोध्‍येत जातो, तेव्हा मंहत मला एकच प्रश्न विचारतात, तो म्हणजे राम मंदिर कधी बनेल.' आज मी अयोध्येत गेलो नाही ते बरेच झाले.
- तुम्हाला कदाचित माहीत असेलच, केन्द्र सरकारने अयोध्येत रामायणावर आधारित रिसर्च सेंटर आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालयाची घोषणा केली आहे.
- दुसरीकडे, अखिलेश यादव सरकारने देखील अयोध्येत रामलीला थीम पार्क स्थापण करण्याची घोषणा केली आहे.
- यावर कटियार म्हणाले की, उठसूट जो तो पार्क बनवण्याच्या घोषणा करत आहे. अयोध्येचा विकास होणार आहे, ही चांगली गोष्ट आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या घोषणांचे स्वागत करायला हवे. पण, राम जन्मभूमीत राम मंदिर नसेल, ही गोष्‍ट देशातील जनतेला न पटणारी आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, अयोध्येतील प्रस्तावित रामायण संग्रहालयासंदर्भात काय म्हणाले महेश शर्मा...
बातम्या आणखी आहेत...