आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिर अयोध्येत नाही तर पाकिस्तानात बनेल काय? भाजप नेते गिरिराज सिंहांचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राम मंदिर अयोध्येत नाही तर पाकिस्तानात बनेल काय? असा सवाल बिहारमधील भाजपचे खासदार गिरिराज सिंह यांनी केला आहे. राम मंदिर केव्हा आणि कसे बनेल, हे आता काळ सांगणार असल्याचे सिंह यांनी सांगितले.  

गिरिराज म्हणाले, राम मंदिरांचा मुद्दा केवळ राजकीय पक्षांचा नाही... 
- गिरिराज सिंह यांनी सांगितले की, राम मंदिराचा मुद्द्याकडे केवळ राजकीय पक्षांशी जोडून पाहू नये. देशातील कोट्यवधी जनतेशी हा मुद्दा संबंधित आहे. अयोध्येत राम मंदिर उभारण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे.  
- मात्र, निवडणुका जाहीर झाल्यानंतरच राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलले जाते.

दरम्यान, भाजपचे नेते विनय कटियार यांनी रविवारी याच मुद्द्याला हात घातला होता. राम मंदिरचा मुद्दा ऐरणीवर आहे. कायदाच्या मदतीने लवकरच राम मंदिराला मुद्दा मार्गी लावण्यात येईल, असे कटियार यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा... विनय कटियार यांनी सांगितले तीन फॉर्म्युला...राहुल यांना म्हणाले विझलेला दिवा... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...