आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रज्ञावान विनय पिंजानीला घरी जाऊन दिली पदवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलवर (राजस्थान) - विनय पिंजानी या विद्यार्थ्याची लहानपणीच दृष्टी गेली. त्या वेळी तो पाचवीत शिकत होता. मित्रांच्या उपद्व्यापामुळे विनयवर ही वेळ आली. अंधत्व आल्यामुळे शिक्षणात अडथळे निर्माण झाले, पुढील शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. टेपरेकॉर्डरच्या मदतीने त्याने यावर मात केली. वर्गात धड्याचे रेकॉर्डिंग केल्यानंतर घरी ते ऐकून त्याचा नियमित अभ्यास करू लागला. याच पद्धतीने त्याचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. त्यात त्याला एमफिल आणि नेट परीक्षा उत्तीर्ण होण्यात यश मिळाले. यानंतर त्याने पीएचडीही केली. विनय पिंजानीच्या या जिद्दीला सलाम करत राजस्थान विद्यापीठाचे तत्कालीन कुलपती डॉ. एन.के. जैन यांनी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख रूपसिंह बारेठ, सहायक रजिस्ट्रारसह तीन प्रतिनिधींना विनयच्या अलवर येथील घरी पाठवून पदवी प्रदान केली. अलवरच्या शाळेतील प्राथमिक शिक्षणानंतर दिल्लीच्या अंध शाळेत त्याने प्रवेश घेतला. तिथे त्याने उच्च शिक्षण घेतले. १९९६ मध्ये दिल्लीच्या हिंदू कॉलेजमध्ये पदवी आणि यानंतर १९९८ मध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.

सरकारशी संघर्ष करून नोकरी मिळवली
विनयने २००३ मध्ये प्राथमिक शिक्षकाची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, सरकारने अंधांच्या कोट्यासाठी एकही जागा ठेवली नव्हती. त्यामुळे तेव्हा नोकरी मिळू शकली नाही. या निर्णयाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. त्याचा निकाल २०११ मध्ये आला. तोपर्यंत त्याच्या दोन नोकर्‍या झाल्या होत्या. परंतु त्याने आधीचा सेवाकाळ सध्याच्या सेवेत ग्राह्य धरण्याची विनंती न्यायालयाकडे केली. महाविद्यालयीन शिक्षणामध्येही सरकारने कोणताही कोटा ठेवला नव्हता. आपल्या जागेसाठी त्याने न्यायालयात धाव घेतली आणि सरकारकडून हक्क प्राप्त केला.