आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीला 2 प्रियकर, म्हणाली- एकतर पतीला मारा, नाहीतर मला; मग घडले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपींनी विनोदचे डोके आणि नाकाची हाडेही तोडली. (इन्सेट आरोपी) - Divya Marathi
आरोपींनी विनोदचे डोके आणि नाकाची हाडेही तोडली. (इन्सेट आरोपी)

उदयपूर - सोमवार रात्री निर्मनुष्य परिसरात मिळालेल्या मृतदेहाची मंगळवारी विनोद माळी अशी ओळख पटली आहे. मृताची ओळख पटताच 24 तासांच्या आत पोलिसांनी या ब्लाइंड मर्डर केसचा उलगडा केला आहे. याप्रकरणी मृताची पत्नी आणि तिच्या दोन प्रियकरांना अटक करण्यात आली आहे. 

> वास्तविक, मृत विनोदसह मोनिकाचे मर्जीविरुद्ध कोर्टमॅरेज झाले होते. यामुळे ती त्याच्यापासून सुटका करून घेऊ इच्छित होती. मोनिकाने तिचे पहिला प्रियकर दुर्गेश तेली आणि दुसरा प्रियकर विनोदच्या बहिणीच्या दिरासह मिळून खुनाचा कट रचला होता.


पत्नीचे अफेअर उठले जिवावर...
- पोलिस सूत्रांनुसार, मोनिका 12 वर्षांची होती तेव्हा तिचे लग्न भिंडर येथे राहणाऱ्या हिंमत माळीसह झाले होते. सहा वर्षे भिंडरमध्ये राहिल्यानंतर हिंमतशी मोनिकाचा घटस्फोट झाला.
- यानंतर मोनिका 3 वर्षे माहेरातच राहिली. घटस्फोटित असल्याने आणि दुर्गेशशी अफेअर असल्याने घरच्यांनी मोनिकाचे विनोदशी 5 महिन्यांपूर्वी लग्न लावून दिले, परंतु तिला विनोदसोबत राहायचे नव्हते.

- मागच्या 3 वर्षांपासून मोनिकाचे दुर्गेशसोबत अफेअर सुरू होते. दुसरीकडे सासरी राहत असताना मोनिकाचे कपिलशीही सूत जुळले. हा जेव्हा तिचा पती विनोद कळला तेव्हा त्याने मोनिकाचा मोबाइल तोडून टाकला आणि सिमही घेतले.

- विनोदशी भांडण झाल्याने ती माहेरी गेली. घरच्यांनी दबाव टाकून तिला परत विनोदकडे पाठवले. परंतु येथे येऊन तिने पतीचा काटा काढण्याचा कट रचला.

बाइक खराब झाल्याचा बहाणा करून दुरुस्त करायला बोलावले, मग दगडांनी ठेचले
- तिन्ही आरोपी मागच्या 15 दिवसांपासून विनोदचा काटा काढण्याचा कट रचत होते. मोनिकाकडे मोबाइल नसल्याने तिने आपल्या सासूचा म्हणजेच विनोदच्या आईच्या मोबाइलवरून दुर्गेश तेलीला फोन करून म्हटले की, एक तर माझ्या पतीला मार, नाहीतर मला मारून टाक.
- दुर्गेशने कपिलशी संपर्क करून घटनास्थळ गाठले. मग कपिलने मोटारसायकल खराब झाली असून ती दुरुस्त करण्याच्या बहाण्याने विनोदला बोलावले.
- विनोद तेथे पोहोचल्यावर त्याला दुर्गेश दिसताच त्याला संशय आला. तो दुर्गेशला आधीपासून ओळखत होता. तेवढ्यात कपिलने विनोदच्या डोक्यावर वार केले.
- विनोद जखमी होऊन काही अंतर पळाला. त्याचा चष्मा पडल्यावर दुर्गेशने मिरची पावडर विनोदच्या डोळ्यात टाकली. यानंतर दोघांनी मोठे दगड उचलून विनोद डोक्यावर टाकले. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

 

शेजारणीच्या मोबाइलवरून फोन करून विचारले- काम झाले का? उत्तर आले- जय माता दी
- खुनानंतर संध्याकाळी 8 वाजता मोनिकाने आपल्या शेजारणीच्या मोबाइलवरून कपिलला फोन लावून विनोदबाबत विचारले. तेव्हा कपिलने कोडवर्डमध्ये उत्तर दिले- जय माता दी. म्हणजेच विनोदचा खून केला आहे.

 

कॉल डिटेलमधून पकडला गेला कपिल, मग उलगडले रहस्य
- कॉल डिटेल आल्यानंतर संशयित असलेल्या कपिलला मंगळवारी संध्याकाळी पोलिस पकडून घेऊन गेले. त्यांनी मोनिकालाही ताब्यात घेतले. दोघांच्या चौकशीत त्यांनी दुर्गेशबाबत सांगितले. स्पेशल टीमने दुर्गेशच्या टॉवर लोकेशनच्या आधारे त्याचा शोध घेतला आणि त्यालाही अटक केली. येथे तिघांनाही पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....

बातम्या आणखी आहेत...