आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असाध्य आजार असूनही 40 वर्षांची शिक्षणसेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोटा - मस्क्युलर डिस्ट्रोफी आजाराने ग्रस्त विनोदकुमार बन्सल 65 व्या वर्षीही शिकवत असलेले पाहून एम्समधील डॉक्टरांना आश्चर्याचा धक्काच बसला. आजार असाध्य असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, शिकवणे हेच औषध असलेले बन्सल जगातील एकमेव उदाहरण आहे.

बन्सल यांची कथा एम्सच्या न्यूरोलॉजी विभागामध्ये जानेवारी 2014 मध्ये झालेल्या एका परिसंवादात ऐकवण्यात आली. 500 न्यूरोलॉजिस्टनी त्यास आश्चर्य ठरवले. बन्सल यांनी डॉक्टरांना सांगितले की, 30 वर्षे त्यांनी दररोज 6 तास लिहिले. त्यामुळे हाताच्या मांसपेशी व्यवस्थित काम करत राहिल्या. 2012 पर्यंत रोज 7-8 तास लेक्चर दिल्यामुळे फुप्फुस आणि हृदय व्यवस्थित काम करत राहिले. जेके कारखान्यात अभियंतापदी कार्यरत असलेल्या बन्सल यांनी 1974 मध्ये पहिल्यांदा एम्समध्ये तपासणी केली तेव्हा डॉक्टरांनी या आजारावर इलाज नसल्याचे त्यांना सांगितले. मात्र, बन्सल यांनी हार मानली नाही. ते कोट्याला परतले. बन्सल म्हणाले, जिथे चालण्या-फिरण्याची आवश्यकता नाही असा रोजगार शोधा, असा सल्ला एका न्यूरोलॉजिस्टने दिला होता. त्यांनी 10 व्यवसाय सांगितले. त्यात ‘टीचिंग अँट होम’चाही होते. शिकवून आजाराला चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो असा निश्चय केला. जुलै 1981 मध्ये घरात पहिल्यांदा पुनीत पांडेला शिकवले. तो आज दूरचित्रवाणी जगतामध्ये सुस्थितीत आहे.