फोटो संसदेसमोर वेस्टमिंस्टर ब्रिजवरून जाणा-या विंटेज कार.
लंडन - ब्रिटनची राजधानी असलेल्या लंडनमध्ये ब्रायटन व्हेट्रन कार रनचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मोठ्या संख्येने कार सहभागी झाल्या होत्या. पहिल्या ब्रायटन रनचे आयोजन 1896 मध्ये करण्यात आले होते. पण आता यामध्ये केवळ 1905 पूर्वीच्या मॉडेल असलेल्या कारलाच सहभागी होण्याची परवानगी दिली जाते. या रन दरम्यान अनेक कार नादुरुस्तही झाल्या होत्या.
लंडनपासून ब्रायटनपर्यंत होणा-या या रनमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने शेकडो गाड्या सहभागी होत असतात. पण त्यांची सरासरी गती ताशी 20 मैल एवढी असते. 60 मैलाच्या या रनमध्ये 500 विंटेज कार सहभागी झाल्या होत्या. या कार ब्रिटनबरोबरच अमेरिका, कॅनाडा, हाँगकाँग, स्वीडन, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियामधून या रनमध्ये सहभागी झाल्या होत्या.
पुढील स्लाइडवर पाहा, कार रनचे PHOTO