आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Violence Continue In Muzaffarnagar, 31 Victims Died

मुजफ्फरनगरात हिंसाचार सुरूच, बळींची संख्या 31 वर पोहोचला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुजफ्फरनगर - उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर आणि शामलीत जातीय हिंसाचार सुरूच आहे. सोमवारी यात आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे दंगलीतील मृतांचा आकडा 31 वर पोहोचला आहे. घटनेच्या चौकशीसाठी सरकारने न्यायालयीन आयोगाची नेमणूक केली आहे.


दंगेखोरांनी सोमवारी तीन दुचाकीस्वारांवर गोळ्या झाडल्या. यात एकाचा मृत्यू झाला. दुस-या एका व्यक्तीची शामलीमध्ये हत्या झाली. दंगलग्रस्त भागात 48 तास संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असे मुजफ्फरनगरचे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सांगितले. मुजफ्फरनगरमध्ये गुरुवारपर्यंत शाळा, कॉलेजेस बंद राहतील.
पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली असून, सर्व रेल्वेस्थानके आणि उत्तराखंडमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.


1000 जणांविरुद्ध एफआयआर
भाजप आमदार हुकूमसिंह, सुरेश राणा, भारतेंदू, संगीत सोम आणि काँग्रेसचे माजी खासदार हरेंद्र मलिक यांच्यासह 1000 जणांविरुद्ध एफआयआर दाखल झाला. त्यांच्यावर चिथावणी देण्याचे आरोप आहेत. शस्त्रास्त्र परवानेही रद्द करण्यात आले आहेत.


डीआयजी, एसपींची उचलबांगडी
मुजफ्फरनगरचे एसपी सुभाषचंद्र दुबे, शामलीचे एसपी अब्दुल हमीद यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अनुक्रमे प्रवीणकुमार आणि अनिल राय यांची नेमणूक झाली आहे.