आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘काश्मीरमधील हिंसाचारात नॅकाॅची फुटीरवाद्यांना साथ’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात हिंसाचार भडकवण्यामागे नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचाच हात आहे. फारुक अब्दुल्ला यांचे फुटीरवाद्यांशी असलेले सख्य जगजाहीर आहे, असा टोला मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी लगावला.
श्रीनगरातील एका कार्यक्रमात बोलताना मेहबूबा मुफ्ती बोलत होत्या. त्यांनी सांगितले, फारुक यांनीच आपल्या कार्यकर्त्यांना फुटीरवाद्यांना साथ देण्यास भडकावले आहे. नॅशनल कॉन्फरन्स हा त्यांचा पक्ष सत्तेसाठी काहीही करू शकतो, असा अारोप त्यांनी केला. फारुक यांना शांतता नको आहे हे त्यांच्या वक्तव्यावरून सिद्ध होते. खोऱ्यामध्ये अशांतता माजवण्यासाठी ते वाट्टेल ते करण्यास तयार असतात. कुणाशीही हातमिळवणी करू शकतात, असे मेहबूबा म्हणाल्या.

पाच महिन्यांपासून नॅशनल कॉन्फरन्स गुन्हेगारी कटात बरबटलेला आहे. शाळा जाळण्यात येत आहेत. दगडफेक केली जात आहे. हिजबुलचे दहशतवादी पोलिसांना धमकावत आहेत. लष्करांचे मनोधर्य खच्ची करण्याचे काम चालू आहे. लोक शांततेत रस्त्यावरून मार्गक्रमण करत असतात. पण फारुक त्यांच्या बेताल वक्तव्यातून अशांतता माजवत आहेत. फारुक अब्दुल्ला यांनी त्यांचे पिता शेख अब्दुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी झालेल्या कार्यक्रमात फुटीरवाद्यांनी एकी दाखवावी, नॅशनल कॉन्फरन्स तुमच्यासोबत असेल, असे आवाहन केले होते.

राज्यपालांचा सतर्कतेचा आदेश
जम्मू| राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी मंगळवारी जवानांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या आठवड्यात ते दिल्लीत होते. केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर परतलेल्या व्होरा यांनी जवानांना वरील आदेश दिले. जवानांचे आर्मी फॉरेस्ट डेवर स्मरण करावे, असे आवाहन त्यांनी जनतेस केले. जवानांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे, याची जाणीव त्यांना व्हावी. ७ डिसेंबर रोजी हा दिन साजरा होतो. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढा देताना आपण जवानांना आणि अधिकाऱ्यांना गमावून बसत अाहोत, असे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...