आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीची छेड: जमशेदपूरला भडकली दंगल, तणावाचे वातावरण, अनेक पोलिस जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपुर (झारखंड) - जमशेदपूरमध्‍ये एका मुलीच्‍या छेडखानीतून उसळलेला सांप्रदायीक तणाव मंगळवारीही चांगलाच पेटला. छेडखानी विरोधात विश्‍व्‍ा हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्‍या वतीने शहरात बंद पुकारण्‍यात आला होता. मात्र या बंदला हिंसक वळण मिळाले. संघटनांच्‍या कार्यकर्त्‍यांनी रास्‍ता रोको करून वाहनांची तोडफोड व जाळपोळही केली. पोलिसांना यावेळी लाठीचार्ज करावा लागला. मात्र गर्दीवर नियंत्रण मिळवताना कित्‍येक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले.
शहरात कलम 144 लागू
शहरात सोमवारी रात्रीपासून कलम 144 लागू आहे. जागोजागी अतिरिक्त पोलिस तैनात करण्‍यात आले आहेत. या घटनेमुळे बुधवारी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्‍याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे. मुख्‍यमंत्री रघुवर दास यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
सोमवारपासून भडकला तणाव
सोमवारी रात्री सुमारे साडेनऊ वाजता एका मुलीची काही लोकांनी छेड काढली. त्‍यानंतर दोन्‍ही गटाचे लोक समोरा-समोर आले. या तणावाला पुढे चांगलेच हिंसक वळण मिळाले. घटनास्‍थळी पोलिस दाखल झाले. मात्र, पोलिसांना न जुमानता जोरदार दगडफेक या ठिकाणी करण्‍यात आली.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, संबंधित PHOTOS..