आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहारनपूर येथे तणाव; गोळीबारात तिघे जखमी, 3 आठवड्यांत 4 वेळा संघर्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहारनपूर - सहारनपूरमध्ये ठाकूर आणि दलितांदरम्यान हिंसा सुरूच आहे. बुधवारी सकाळी सहारनपूरच्या जनकपुरी परिसरात जनता रस्त्यावर एका व्यक्तीवर गोळी झाडण्यात आली. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बडगाव येथे दोघांना मास्कधारी लोकांनी गोळ्या घातल्या. हे दोघे रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळून आले. या दोन्ही व्यक्ती प्रजापती जातीच्या असल्याचे सांगण्यात आले आहे. हा गोळीबार दलित समुदायाच्या लोकांनी केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. येथे तणाव वाढला असून मोठ्या संख्येने पोलिस तैनात केले आहेत. वरिष्ठ पोलिस अधीक्षक सुभाषचंद्र दुबे यांनी सांगितले की, सहारनपूर हिंसेमध्ये अातापर्यंत २४ लोकांना अटक करण्यात आली आहे.  
 
दरम्यान, राज्य सरकारने हिंसेत ठार झालेल्या आशिषच्या वारसांना १५ लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि जखमींच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी याला दुजोरा दिला आहे. मंगळवारी मायावतींच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या आशिष यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी जातीय हिंसा आणि तणावाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचा फौजफाटा सहारनपूर येथे पाठवला आहे. मंगळवारी रात्री चार बडे अधिकारी लखनऊ येथून रवाना झाले आहेत.  
 
गेल्या तीन आठवड्यांत सहारनपूर येथे चौथ्यांदा जातीय हिंसा भडकली आहे. मंगळवारी बसपा प्रमुख मायावती सहारनपूर दौऱ्यावर होत्या. त्यांच्या भेटीनंतर येथे पुन्हा हिंसा भडकली. शब्बीरपूर येथून परतत असताना बसपा कार्यकर्त्यांच्या गाडीवर एका जाती समुदायाने हल्ला केला होता. या वेळी ६ जण जखमी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...