आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Violent Agitation Over Youth Killed In Encounter In Jammu & Kashmir

J&K मध्ये युवकाच्या मृत्यूवर हिंसक आंदोलन, 2 जखमी, जवानाची एके 47 हिसकावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू आणि काश्मिरातील त्राल परिसरात दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत एका युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी जोरदार हिंसक आंदोलन करण्यात येत आहे. लष्कराचे जवान आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीत दोन नागरिक जखमी झाले आहेत. या दरम्यान काही आंदोलकांनी जवानांची एके 47 हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन फुटीरतावादी नेते यासीन मलिक आणि मसरत आलम यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
त्राल परिसरात झालेल्या चकमकीत युवकाचा मृत्यू झाला. युवकाच्या कुटुंबीयांनी लष्करावर बनावट एन्काऊंटरचा आरोप केला आहे. या तरुणाचे दहशतवाद्यांसोबत संबंध होते. तो हिज्बुलच्या टॉप दहशतवाद्यांना भेटायला गेला होता, याचे सबळ पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. चकमक सुरु असताना लष्कराच्या जवानांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो थांबला नाही. अखेरच चकमकीत तो मृत्युमुखी पडला. पोलिस या प्रकरणी तपास करीत आहे.
लष्कराने मांडली भूमिका
काल कमला जंगलात हे एन्काऊंटर झाले. दहशतवाद्यांनी पेट्रोलिंगवर असलेल्या जवानांवर गोळीबार केला. यात एक जवान जखमी झाला. गोळीबाराला जवानांनी प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यावर सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. तेव्हा जवानांना खालिद मुजफ्फरचा मृतदेह सापडला. त्याच्याजवळ दोन एके 47 रायफल सापडल्या आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, जम्मू आणि काश्मिरमध्ये सुरु असलेले आंदोलन... अशी झाली शोकसभा...