आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गार्डवर हमर चढवणार्‍या उद्योगपतीची हातकडी काढून पोलिसांनी केली हॉटेलमध्ये पार्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्रिशूर (केरळ) - कोर्टात सुनावणीसाठी आणलेल्या आरोपी उद्योजकाची हातकडी सोडून त्याला कुटुंबिय आणि मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवणाची परवानगी देणाऱ्या पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. केरळचा अब्जाधिश विडी उद्योजक मोहम्मद निशाम याला गार्डच्या अंगावर गाडी चढवण्याच्या आरोपात अटक करण्यात आले असून मंगळावारी त्याला केरळच्या त्रिशूर कोर्टात सुनावणीसाठी हजर करण्यात आले. कोर्टाने दुपारी लंचब्रेक घेतल्यानंतर आरोपीने कुटुंबियांसोबत हॉटेलमध्ये लंच करण्याची पोलिसांना परावनगी मागितली आणि त्यांनीही तत्काळ त्याला होकार दिला होता.
पोलिसही पार्टीत सहभागी झाले होते
त्रिशूर येथील एका कोर्टात निशामची सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टने त्याला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जाण्याचे आदेश दिले. मात्र पोलिसांनी तसे न करता ते निशामसोबत एका हॉटेलमध्ये गेले. एवढेच नाही तर तिथे पोलिसांनी त्याच्यासोबत पार्टी केली. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की निशामजवळपास दोन तास एका हॉटेलच्या स्पेशल रुममध्ये होता. तेव्हा त्याची हातकडी काढलेली होती. ज्या हॉटेलमध्ये पार्टी झाली त्याचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी जप्त केले आहे.
काही सेकंद लेट झाल्याने चढवली हमर
याच वर्षी जानेवारीमध्ये निशामने त्रिशूर येथे त्याच्या गार्डवर हमर कार चढवली होती. गार्डने गेट उघडण्यास काही सेकंद उशिर केल्यामुळे चिडलेल्या मोहम्मद निशामने त्याच्या अंगावर गाडी चढवली होती. गाडीतून उतरल्यानंतर त्याने गार्डला लोखंडी रॉडने बेदम मारले होते. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान गार्डचा मृत्यू झाला. विडी उद्योगासोबत निशामचा मिडल इस्टमध्ये प्रॉपर्टीचा देखील व्यवसाय आहे.
बातम्या आणखी आहेत...