आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानशी युध्द तयारीच्या नावावर हा फोटो होतोय व्हायरल, जाणून घ्‍या वास्तव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वार्ताहरांनुसार कोटाचे स्टेशन मास्तरही अशी ट्रेन स्टेशनवर आल्याचे मान्य करत नाही. - Divya Marathi
वार्ताहरांनुसार कोटाचे स्टेशन मास्तरही अशी ट्रेन स्टेशनवर आल्याचे मान्य करत नाही.
कोटा - उरी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्‍ये वाढत्या तणावामुळे एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो ब-याच लोकांनी शेअर केलायं. फोटोत रणगाडे असलेली एक ट्रेन दिसत आहे. संबंधित फोटो कोटा स्टेशनचे असल्याचे सांगितले जात आहे. रणगाडे युध्‍दासाठी सीमेवर नेले जात आहेत. कोटा स्टेशन मास्तरने सांगितले आहे, की अशी कोणतीही ट्रेन त्यांच्या स्टेशनवर आलेली नाही. जाणून घ्‍या काय आहे या फोटोचे वास्तव...
- वास्तविक हे रणगाडे जबलपूरहून सैन्याच्या डेपोत पाठवले जात आहेत.
- जबलपूरमध्‍ये सैन्याचे एक सेंट्रल ऑर्डिनन्स डेपो आहे. येथून नेहमी शस्त्रास्त्रे देशाच्या वेगवेगळ्या डेपोत पाठवले जातात.
- जेव्हा ट्रेन इटारसी स्टेशनवर थांबली तर लोकांची नजर रणगाड्यांवर गेली.
- हे रणगाडे पाहण्‍यासाठी प्रवाशांची गर्दी जमा होऊ लागली.
- लोक जवळपास अर्धातास रणगाडे पाहत व फोटोही काढत होते.
सोशल मीडियावर काय म्हणतात लोक?
- सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो युध्‍द तयारी असल्याचे सांगितले जाते.
- वार्ताहरांनुसार कोटाचे स्टेशन मास्तरही अशी ट्रेन स्टेशनवर आल्याचे मान्य करत नाही.
- अनेक ठिकाणी सोशल मीडियावर हा फोटो जुना असल्याचे सांगितले जाते.
पुढील स्लाइड्सवर पाहा सोशल मीडियावर कसे कसे कॉमेण्‍ट येत आहेत...
बातम्या आणखी आहेत...