आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीच्‍या धाकाने 3 महिने केली नाही आंघोळ, ग्रामस्‍थांनी मुलाला खेचले हातपंपावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकता - कडाक्‍याच्‍या थंडीला कंटाळून एका लहान मुलाने एक दोन नव्‍हे, तब्‍बल 3 महिने आंघोळ केली नाही म्‍हणून गावातील लोकांनी त्‍याला आंघोळ घातली. कोलकतामधील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्‍हायरल होत आहे. या व्‍हिडिओत आरडाओरडा करून हा मुलगा लोकांचा प्रतिकार करताना दिसत आहे. व्‍हिडिओमधील घटना ही कोलकतामधील असल्‍याचे लक्षात येत आहे. थंडीमुळे एका मुलाने चक्‍क 3 महिने आंघोळ केली नाही. म्‍हणून गावातील काही लोकांनी त्‍याला हातपंपावर आंघोळ घातली. हा मुलगा आंघोळीला नकार देत असल्‍याने त्‍याचे पाय बांधण्‍यात आल्‍याचे दिसत आहे. या घटनेचे फोटो आणि व्‍हिडिओ व्‍हायरल झाला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा PHOTOS, अखेरच्‍या स्‍लाइडवर VIDEO..