आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी आणि गजुराती भाषेतील या रॅपर्सचे Video इंटरनेटवर झालेत व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योयो हनिसिंग, बादशाह आणि रफ्तार अशा काही रॅपर्सची नावे गेल्या काही वर्षांपासून आपण ऐकतो. त्यांनी गायलेली किंबहुना रॅप केलेली गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. रॅप हा गाण्यातील असा प्रकार आहे, ज्यात गायक त्याला हव्या त्या शब्दांच्या माध्यमातून भावना व्यक्त करू शकत असतो. तरुणांच्या एका ग्रुपने अशाच प्रकारच्या प्रादेशिक भाषेतील रॅपच्या माध्यमातून आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.

हिप हॉप या नृत्य प्रकाराबरोबर रॅप साँगचे सादरी करण केले जाते. मराठी आणि गुजराती भाषेतील रॅपचे खास व्हिडीओ तयार करून हे तरुण इंटरनेटवर तो अपलोड करतात. त्याला मोठ्या प्रमाणावर पसंतीही मिळत आहेत. पण त्याचवेळी केवळ काहीतरी शब्द लिहून त्याला विशिष्ट चालीत गाण्याऐवजी सामाजिक भान ठेऊन आपल्या ओळी लिहिण्यावर हे तरुण भर देतात.

विविध गटातील होतकरू, गरीब आणि तरुण मुलांनी एकत्र येऊन हा ग्रुप तयार केला आहे. या मुलांच्या ग्रुपमधील विवध सदस्यांची नावे एमसी तोडफोड, गुजराती रॅपर आणि एमसी मवाली (मराठी) अशी आहे. शब्दांची तोडफोड करून त्यातून काहीतरी चांगला संदेश द्यायचा प्रयत्न ही मुले करतात.
पुढील स्लाइड्वर पाहा, गुजराती रॅपरचा व्हिडीओ... मराठी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा वरील स्लाइडवर...