आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशाल ददलानींनी मागितली मुनी तरुणसागर यांची माफी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - संगीतकार विशाल ददलानी यांनी बुधवारी जैनमुनी तरुणसागर महाराज यांची भेट घेऊन त्यांची वैयक्तिकरीत्या माफी मागितली. तरुणसागर महाराजांनी हरियाणा विधानसभेला संबोधित केले होते त्याबद्दल ददलानी यांनी केलेल्या ट्विटमुळे जैन समुदायात संतापाची लाट उसळली होती.

विशाल ददलानी यांनी बुधवारी तरुणसागर महाराजांची भेट घेतली आणि जैन समुदायाच्या नियमानुसार स्वत:चे कान पकडून महाराजांची माफी मागितली. तरुणसागर महाराज म्हणाले की, ‘मला वैयक्तिकरीत्या वाईट वाटलेले नाही किंवा माझ्या भावना दुखावल्या नाहीत हे मी सुरुवातीपासून सांगत आहे. मी विशाल यांच्याशी चर्चा केली. जैन धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे ददलानी यांनी माझी वैयक्तिक भेट घेऊन माफी मागावी, अशी त्यांची मागणी होती. त्यानंतरच ददलानींविरोधात सुरू केलेली निदर्शने थांबवली जातील, असे जैन धर्मीयांनी स्पष्ट केले होते. आता ददलानी यांनी जैन धर्मीयांचीच माफी मागावी, असे मी त्यांना सांगितले आहे. कोणाकडूनही चूक होऊ शकते, पण त्या चुकीची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. चूक करणाऱ्याला माफी करावी. ददलानी हे माझ्यासमोर उपस्थित झाले तर त्यांनी पंच माफी मागावी, त्यानंतर हे प्रकरण संपुष्टात येईल, अशी जैन धर्मीयांनी विनंती केली होती.’
महाराजांच्या या वक्तव्यानंतर विशाल ददलानी यांनी तरुणसागर महाराजांसमोर दोन्ही हात जोडले तसेच कान धरून त्यांची माफी मागितली. आपण भविष्यात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत, असेही ददलानी यांनी सांगितले. त्यानंतर जैन समुदायाने आता ददलानींना माफ करावे आणि ज्यांनी ददलानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्यांनी हे प्रकरण येथेच संपवावे, असे आवाहन तरुणसागर महाराजांनी केले.
बातम्या आणखी आहेत...