आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vitthal Radadia Remarriaged His Daughter In Law, Divya Marathi

कन्यादान:विधवा सुनेचा पुनर्विवाह, भाजप खासदाराने घालून दिला आदर्श

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट - पोरबंदरचे भाजप खासदार आणि शेतकरी नेते विठ्ठल रादडिया यांनी समाजासमोर आदर्श घालून दिला आहे. मुलाचे निधन झाल्यानंतर त्यांनी सून मनीषाला मुलगी मानले आणि तिचा पुनर्विवाह करून दिला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी आपला दिवंगत मुलगा कल्पेश याच्या नावावरील १०० कोटी रुपयांची संपत्तीही मनीषाला कन्यादानात दिली.

विठ्ठल रादडिया यांचा धाकटा मुलगा कल्पेश याचे हृदयविकारामुळे ९ महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्याला ५ वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी आहे. ही दोन्ही मुले मनीषासोबत राहतील. हा पुनर्विवाह शुक्रवारी झाला. मनीषा आणि दोन्ही मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सुनेचा पुनर्विवाह करण्याची विठ्ठल रादडिया यांची इच्छा होती. मुलाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनीच त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले होते. अखेर त्यांनी जावई म्हणून हार्दिक चौवडिया यांची निवड केली. विठ्ठल यांचा थोरला मुलगा ललित रादडियाचा सुरतमध्ये व्यवसाय आहे. हार्दिक त्याच्यासोबतच काम करतो. हे दोघेही मित्र आहेत.