आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळ हसण्‍याच्‍या गुढ आवाजाने सगळेच घाबरले; नंतर खो खो हसले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उडुपी (कर्नाटक) – नारळाची घनदाट बाग. अधेमध्‍ये मजुरांसाठी बांधलेली एकद-दुसरी खोप्‍पी. त्‍यात वास्‍तव्‍यास असलेले मजुरांची कुटुंबं. त्‍यात एकाही घरात लहान बाळ नव्‍हतं. पण, रात्री, बेरात्री कधी तर भल्‍या सकाळी अचानक कुठून तरी तान्‍ह्या बाळाच्‍या हसण्‍याचा आवाज येई नि शेजारी राहणारी मजुराच्‍या अंगाचा थरकाप उडे. पण, हा आवाज केवळ गोविंदा नावाच्‍या मजुराच्‍या झोपडीजवळच येई. आजपास शोध घेतला असता कुणीच दिसत नव्‍हते. त्‍यामुळे या आवाजाची भीती वाढत गेली नि पूर्ण गावात भुटातकीची चर्चा झाली. कुणे सांगे की बांळातीण बाई नि तिच्‍या चिमुल्‍याचा मृत्‍यू झाला. आता तिचं बाळ हसत आहे. त्‍यामुळे मांत्रिकही बोलवण्‍यात आला. पूजा अर्चा केली. पण, बाळाचे हसणे काही बंद झाले नाही. मात्र, एक दिवस हसण्‍याच्‍या आवाजाचे गूढ उकलले आणि सगळेच खो- खो हसायला लागले.
नेमका कुठून येत होता आवाज
झाले असे, उडपी जिह्रयातील गोविंदाच्‍या झोपडीजवळ एक नारळाचे झाड होते. परंतु काही दिवसांपासून त्‍याच्‍या घराच्‍या परिसरात तान्‍ह्या बाळाच्‍या हसण्याचा आवाज येत होता. सुरुवातीला वाटले कुणी महिला तिचे मूल घेऊन आली असेल. त्‍यामुळे दुर्लक्ष गोविंदोन दुर्लक्ष केले. पण, वारंवार आवाज यायला लागला तसा त्‍याचे आणि त्‍याच्‍या कुटु‍ंबियांनी शोध घेणे सुरू केले. मात्र, आवाज नेमका कोठून येतोय, हे कुणाच कळत नव्हते. त्‍यामुळे भुताटकी झाली असावी, असे समजून गोविंदाचे कुटुंब मांत्रिकाकडे गेले. त्‍याने आत्म्याची छाया असल्याचे सांगितले. ही छाया दूर करण्यासाठी हवन करावे लागेल, असा सल्ला दिला. गोविंदा वाटले, ज्योतिषाच्या बोलण्यात काहीतरी नक्कीच तथ्य असले पाहिजे. कुटुंबाने त्याच्या म्हणण्यानुसार हवन केले. परंतु, हसण्याची समस्या कायम राहिली. एक दिवस अचानक या समस्येवरील तोडगा आपोआप समोर आला. नारळ तोडणारा एक मजूर आपला हरवलेला मोबाइल शोधण्यासाठी गोविंदाच्या घरी पोहोचला. सीना पुजारी नावाचा हा मजूर नारळ तोडण्यासाठी गोविंदाच्या घरी नेहमी येत असे. एकेदिवशी तो नारळ तोडण्यासाठी पोहोचला होता. तेव्हा त्याने आपला मोबाइल एका प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून झाडावरच ठेवला होता. परंतु, त्याला या गोष्टीचा विसर पडला. काही दिवसांनंतर त्याला मोबाइलची आठवण आली. परंतु, तो सापडत नव्हता. त्याला मोबाइल हरवल्याचे वाटले. म्हणून त्याने वेगवेगळ्या फोनवरून त्याने मोबाइलवर कॉल केले. कॉल करण्याची नेमकी तिच वेळ होती त्या वेळी रिंगटोन वाजायची. रिंगटोन म्हणून त्याने बाळाच्या हसण्‍याचा आवाज सेट केलेला होता. ही रिंगटोन वाजल्याने आवाज येत होता. बाळ तर कुठेही दिसत नव्हते किंवा तसा प्रश्नही नव्हता. दरम्यान, सीनाला नंतर त्याचा फोन गोविंदाच्या झाडावर असल्याचे आठवले. मग तो फोन घेण्यासाठी तेथे पोहोचला. त्यानंतर बाळाचा तो हसण्याचा गूढ आवाज बंद झाला. गोविंदा आणि त्याच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला. ज्‍यावेळी या घटनेचा खुलासा झाला तेव्‍हा सगळेच खो खो हसले.