आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर पेटले ; गोळीबारात युवकाचा मृत्यू, बंद दरम्यान उसळला हिंसाचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती आणखी बिघडली आहे. त्रालमध्ये सोमवारी जवानांच्या गोळीबारात दोन युवकांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ कट्टरवादी हुरियत कॉन्फरन्सच्या एका गटाने पुकारलेल्या बंददरम्यान हिंसाचार उसळला. या वेळी सीआरपीएफ जवानांच्या गोळीबारात बडगाममध्ये एका युवकाचा मृत्यू झाला.
अग्निवेश ताब्यात
काश्मिरी पंडितांसाठी वेगळी वसाहत स्थापन करण्याच्या निर्णयाला विरोध करणारे स्वामी अग्निवेश यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीपासून त्यांचा या निर्णयाला विरोध आहे.
यासीनचे उपोषण
जेकेएलएफचा नेता यासीन मलिक यालाही पोलिसांनी काही वेळ ताब्यात घेतले. मात्र, सोडल्यानंतर पुन्हा तो उपोषणस्थळी रवाना झाला.
सईदची फूस
इस्लामाबाद |काश्मिरात जिहादमध्ये सहभागी असल्याची कबुली जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईदने दूरचित्रवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत दिली. तो म्हणाला, ‘काश्मिरींना मदत करण्याच्या पाक सरकार आणि लष्कराच्या प्रयत्नांत आम्हीही पूर्ण शक्तीनिशी सहभागी आहोत.'
अनेक नजरकैद
मसरत आलमला अटक केल्यानंतर हुरियतच्या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले असून यात संघटनेचे उदारमतवादी नेते मरवाईज उमर फारूख यांचाही समावेश आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTO