आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओळखपत्र बायोमॅट्रीकने जोडणार, ऑनलाइन बजावता येणार मतदानचा हक्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्र आधार कार्डच्या क्रमांकाने लिंक करताना ते बायोमॅट्रीक प्रणालीनेही जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासदंर्भात आयोगाने सर्व राज्यांकडून सूचना मागवल्या आहेत. या बदलामुळे ऑनलाइन मतदानाचा मार्ग खुला होणार असून मतदाराला निवडणुकीच्यावेळी त्याच मतदारसंघात राहण्याचे बंधन राहणार नाही व कोणत्याही ठिकाणाहून त्याला त्याचा मतदानाचा हक्क बजावता येईल.

मतदार यादीतील विसंगती व चुका दुरुस्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्रे आधार क्रमांकाद्वारे जोडण्याची मोहिम सुरू केली आहे. त्यासाठी एका व्यक्तीचे एकापेक्षा जास्त नावे असू नयेत याची खबरदारी घेतली जात आह. आधारद्वारे कार्ड लिंक होताच त्या मतदाराची इतर ठिकाणची नावे आपोआप रद्द होतील. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या व्यवस्थेत मतदार केवळ त्याचे नाव असलेल्या मतदारसंघातच मतदान करू शतक असे. अनेक लोक शहराबाहेर राहत असल्याने केवळ निवडणुकीसाठी जाऊ शकत नसत व मतदानापासून वंचित राहत असत. ऑनलाइन मतदानामुळे आता त्यांना कोणत्याही ठिकाणाहून मतदान करता येईल. आयोगाकडून सध्या या प्रणालीची चाचणी सुरू आहे. परंतु त्याची अंमलबजावणी कुठे, कशी व कधी होणार याचा निर्णय निवडणूक आयोगालाच घ्यावा लागणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...