आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये नक्षलग्रस्त भागात 55 टक्के मतदान, मांझींचे भवितव्य ठरणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी ५५ टक्के मतदान नोंदवण्यात आले. सहा नक्षलग्रस्त भागासह ३२ मतदारसंघात ही प्रक्रिया शांततेत पार पडली. माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांचे भवितव्य या टप्प्यात मतदान यंत्रात बंद झाले.

गया जिल्ह्यात सर्वाधिक ५५.१६ टक्के मतदानाची नोंद झाली. औरंगाबादचा क्रमांक त्या पाठोपाठ लागतो, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील एका मतदान केंद्रात गावठी बाँब जप्त करण्यात आला. बालार गावात हा बाँब आढळून आला. तो पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतला. रफिगंज आणि इमामगंज मतदारसंघात एक मध्यमवयीन मतदाराला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. अन्य एका घटनेत केंद्रीय राखीव दलाच्या जवानाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

दुसऱ्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी हे इमामगंज मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. त्यांचा सामना जदयूचे अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांच्याशी थेट मुकाबला आहे. अनेक अनुसूचित जातीच्या अनेक मतदारांची नावे यादीतून गायब करण्यात आल्याचा आरोप मांझी यांनी केला आहे. दुसऱ्या टप्प्यात काही मतदारसंघ नक्षलींचे वर्चस्व असलेल्या भागात येतात. नक्षलींच्या भीतीमुळे या भागातील ११ मतदान केंद्रावर दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदान चालले. पहिल्या टप्प्यात ५७.५ टक्के मतदान झाले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, समर्थक अंगावर पडल्याने लालू किरकोळ जखमी
बातम्या आणखी आहेत...