आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकची ISI केजरीवालांची स्पॉन्सर -हरसिमरत, गोव्यात 34% तर पंजाबमध्ये केवळ 15% मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाच राज्यांमध्ये 36 दिवस चालणाऱ्या मतदान प्रक्रियेची सुरुवात शनिवारी सकाळपासून गोवा आणि पंजाबमध्ये सुरू झाली. सकाळी 7 वाजेपासून गोव्यातील 40 जागांसाठी तर 8 वाजता पंजाबमधील 117 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली. गोव्यात 11 वाजेपर्यंत 34% तर पंजाबमध्ये केवळ 15% मतदान झाले आहे. पंजाबमध्ये मतदानासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी आपचे केजरीवाल यांना ISI स्पॉन्सर करत असल्याचे म्हटले आहे. 
 
केजरीवालांचे स्पॉन्सर ISI : हरसिमरत
- मतदानासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर म्हणाल्या की, पंजाबमध्ये 30 वर्षांनंतर एखादा ब्लास्ट झाला आहे. केजरीवाल बब्बर खालसाबरोबर डिनर आणि लंच करत आहेत. त्यावरून त्यांना ISI स्पॉन्सर करत असल्याचे स्पष्ट होते. 
- पंजाबमध्ये गेल्या आठवड्यात एका कारमध्ये सिलेंडर ब्लास्ट जाला होता. त्यात दोन मुलांसह 5 जणांचा मृत्यू झाला होता. 
- मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल मतदानानंतर म्हणाले की, अमरिंदर सिंह 'दलबदलू' आहेत. 
- माझ्याकडे 70 वर्षांचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. 
पर्रिकर म्हणाले गोव्याचे जेवण आवडते.. 
- पर्रिकर म्हणाले, गोव्यात यावेळी मोठ्या प्रमाणावर मतदान होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे गेल्या वेळी झालेल्या 84% मतदानाचा विक्रम यावेळी मोडीत निघेल असेही पर्रिकर म्हणाले. भाजपचा दोन तृतीयांश मताने विजय मिळेल असेही पर्रिकर म्हणाले. 
- गोव्याचे मुख्यमंत्री बनण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना पर्रिकर म्हणाले की, मला दिल्लीपेक्षा गोव्याचे जेवण अधिक आवडते. आता या अर्थ तुम्ही काहीही काढू शकता. 
- गोव्याचे माजी आरएसएस चीफ सुभाष वेलिंगकर यांनीही मतदान केले. 
- महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी, गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना युती राज्यात 22 जागा मिळवत सत्ता स्थापन करेल असा दावा त्यांनी केला. 
- वेलिंगकर असेही म्हणाले की, गोव्यात आरएसएसचे मतदार भाजपला मतदान करणार नाहीत. त्याचा त्यांना फटका बसेल.  
 
प्रथमच पंजाबमध्ये त्रिकोणी लढत
पंजाबमध्ये 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या अकाली-भाजप आणि विरोधात असलेल्या काँग्रेससह आपही निवडणुकीत शक्तीनिशी उतरल्याने पंजाबात प्रथमच त्रिकोणी लढत असल्याचे पाहायला मिळत आहे. 5 वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाश सिंह बादल यांच्या विरोधात अखेरची निवडणूक लढवत असल्याची घोषणा करणारे काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अमरिंदर मैदानात आहेत. अमरिंदर पटियालामधूनही निवडणूक लढवत आहेत. 
पंजाबमध्ये लंबी हॉट सीट
- पंजाबमध्ये लंबी विधानसभा मतदारसंघातून मोठे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 
- शिरोमणी अकाली दलचे विद्यमान मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल मैदानात आहेत. तर काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अमरिंदर सिंह आणि AAPमधून जरनैल सिंह निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. जरनैल सिंह दिल्लीच्या राजौरीचे आमदार होते, पण राजीनामा देऊन चे लंबीतून निवडणूक लढवत आहेत. 
- पंजाबमध्ये 1.98 तर गोव्यात 11 लाख मतदार. 

584 कोट्यधीश आणि 138 उमेदवार डागाळलेले 
- पंजाबमध्ये 117 जागांवर 1145 उमेदवार मैदानात आहेत. त्यात 81 महिला आणि एक ट्रान्सजेंडरही आहे. 428 कोट्यधीश उमेदवार आहेत. 
- यापैकी 100 जणांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत, तर 77 वर गंभीर गुन्हे दाखल आहेत. 
- गोव्यात 40 जागांसाठी 250 उमेदवार मैदानात आहेत. त्यात 131 साऊथ गोवा आणि 119 नॉर्थ गोव्यातून लढतील. यापैकी  157 कोट्यधीश आहेत. 
- गोव्यात 38 उमेदवारांवर गुन्हेगारी खटले सुरू आहेत तर त्यापैकी 19 जणांवर गंभीर गुन्हे आहेत. 
 
गोव्यात 5 माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री मैदानात 
- गोव्यात 5 माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर मैदानात आहेत. कांग्रेसचे रवी नायक, दिगंबर कामत, प्रताप सिंह राणे आणि लुईजिन्हो फलेरो गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्याशिवाय  NCP चे चर्चिल अलेमाओही माजी मुख्यमंत्री आहेत. 

यांच्यावर असतील नजरा 
1# नवज्योत सिंह सिद्धू : भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश. अमृतसर ईस्टमधून निवडणुकीच्या मैदानात. 
2# भगवंत मान : पंजाबच्या जलालाबादमधून आम आदमी पार्टीचे उमेदवार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मानला जात आहे. 
3# सुखबीर सिंह बादल : विद्यमान उपमुख्यमंत्री आणि प्रकाश सिंह बादल यांचे पुत्र. जलालाबादमधून उमेदवार. 
4# लक्ष्मिकांत पारसेकर : गोव्यातील विद्यमान मुख्यमंत्री आणि मेंड्रम मधून भाजपचे उमेदवार. 
5# सुभाष वेलिंगकर: RSS चे माजी नेते. बाहेर पडत गोवा सुरक्षा मंचची स्थापना. शिवसेना आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाबरोबर युती. 

इलेक्शन एका नजरेत 
सीट - गोवा : 40, पंजाब : 117
कँडीडेट - गोवा : 250, पंजाब : 1145
वोटर्स - गोवा : 11 लाख, पंजाब : 1.98 कोटी 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...