आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापमं घोटाळा: सुप्रीम कोर्टाने रद्द केले मध्य प्रदेशच्या 634 MBBS विद्यार्थ्यांचे प्रवेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यापमं द्वारे निवड झालेल्या 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.(फाइल) - Divya Marathi
व्यापमं द्वारे निवड झालेल्या 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.(फाइल)
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्याशी संबंधित खटल्यासंदर्भात सोमवारी सुनावणी केली. 5 वर्षाच्या MBBS कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्या 500 हून अधिक विद्यार्थ्यांची अॅडमिशन प्रोसेस कोर्टाने रद्द केली आहे. या विद्यार्थ्यांनी 2008 पासून 2012 दरम्यान या कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. सरन्यायाधीश जेएस खेहर यांनी विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. 

काय आहे व्यापमं घोटाळा? 
- मध्य प्रदेशमध्ये पब्लिक सर्व्हीस कमिशन ज्या विभागात कर्मचारी भरती करत नाही त्या व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) द्वारे केल्या जातात.
- व्यापमं अंतर्गत प्री-मेडिकल टेस्ट, प्री-इंजिनिअरिंग टेस्ट आणि इतर अनेक सराकारी नोकरीच्या परीक्षा होतात. 
- पण ज्यांची परीक्षा देण्याचीही पात्रता नव्हती त्यांनी कॉन्ट्रॅक्ट टीचर्स, ट्राफिक पोलिस, सब इन्स्पेक्टर्स अशा परीक्षा देऊन ते पास झाले त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. 
- सरकारी नोकरीमधील सुमारे 1000 भरती आणि मेडिकल एक्झाममधील 500 हून अधिक प्रवेश संशयाच्या भोवऱ्यात आहेत. 
- या घोटाळ्याचा तपास मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निगराणीखालील SIT ने केला. त्यानंतर सीबीआयकडे ही चौकशी सोपवण्यात आली. 

असा समोर आला होता घोटाळा 
- सुप्रीम कोर्टाने ज्या प्रकरणी मेडिकल अॅडमिशन प्रोसेस रद्द करण्याचा निर्णय दिला आहे, तो या प्रकरणातील सर्वात मोठा घोटाळा होता. 
- व्यापमंकडून झालेल्या प्री-मेडिकल टेस्टमधील गडबडीप्रकरणी अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. पण जुलै  2013 मध्ये इंदूर क्राइम ब्रँचने डॉ. जगदीश सगर यांना अटक केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. 
- त्यांना मुंबईच्या एका आलिशान हॉटेलातून अटक करण्यात आली होती. त्यांच्या इंदूरच्या घरातून कोट्यवधींची कॅशही जप्त करण्यात आली होती. 
- पोलिसांच्या मते एमबीबीएसची डीग्री असलेल्या सगर यांनी 3 वर्षाच्या कार्यकाळात 100 ते 150 विद्यार्थ्यांना चुकीच्या मार्गाने प्रवेश दिला होता, हे मान्य केले होते. 

2000 हून अधिक अटकेत 
- चौकशीच्या कक्षा रुंदावण्यात आल्या आणि पीएमटीच्या पुढे जात इतर परीक्षांपर्यंत चौकशी झाली. 
- आधी परिक्षेतील चीटींगसाठी 25 लाख रुपये दिलेल्या विद्यार्थ्यांचा शोध सुरू होता. 
- एसटीएफने 2000 हून अधिक संशयितांना अटक केली. 55 एफआयआर दाखल केले. 26 गून अधिक चार्जशीट दाखल करण्यात आले. 

पुढील स्लाइडवर क्लिक करून तीनमिनिटांतच्या व्हिडिओत जाणून  घ्या, व्यापमं घोटाळ्याची संपूर्ण कहाणी... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...