आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापमं घोटाळ्याच्या अाकलनासाठी सीबीआयकडून फेरमांडणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - सीबीआयने व्यापमं घोटाळ्याच्या मास्टरमाइंडपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन मार्ग अवलंबला आहे. गैरव्यवहार शोधण्यासाठी सीबीआय लवकरच रोल नंबर लॉजिक सिस्टिम, उत्तरपत्रिका स्कॅनिंगची फेरमांडणी मंडळाच्या स्ट्राँग रूममध्ये करणार आहे. व्यापमंचे तत्कालीन परीक्षा नियंत्रक पंकज त्रिवेदी, मुख्य सिस्टिम अॅनालिस्ट नितीन महेंद्रा यांनी केलेला गैरव्यवहार समजण्यासाठी हा उपाय शोधण्यात आला आहे.

व्यापमं अधिकारी म्हणाले, सीबीआयला मंडळाच्या प्रवेश व भरती परीक्षांचे फॉर्म्स भरण्याच्या प्रक्रियेला ग्राफिक्सद्वारे दाखवण्यात आले होते. यावर सीबीआयच्या अधिका-यांनी गैरप्रकाराची प्रणाली फेरमांडणी करून समजून घेण्याची इच्छा जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाची परीक्षा प्रक्रिया लाइव्ह डेमॉन्स्ट्रेशन (फेरमांडणी) करून समजून घेण्याचा प्रस्ताव सीबीआयला दिला होता. त्यास सीबीआयने मंजुरी दिली आहे. लाइव्ह डेमॉन्स्ट्रेशन शुक्रवारी होईल.

नितीन यांना सिस्टिम मॉनिटरिंगचे अधिकार : व्यापमं अधिकारी म्हणाले, परीक्षा शाखेच्या केंद्रीय सर्व्हरमध्ये कार्यरत सर्व कर्मचा-यांवर ऑनलाइन देखरेख करण्याचे अधिकार मुख्य सिस्टिम अॅनालिस्ट नितीन महेंद्रा यांना होते. त्यांना संगणक विभागात काम करणारे अजय सेन, चंद्रकांत मिश्रा यांच्यासह अन्य कर्मचा-यांच्या संगणक स्क्रीनवरील डेटामध्ये दुरुस्ती करण्याचे त्यांना अधिकार होते. या अधिकाराअंतर्गत ते लॉजिक सिस्टिममधून जारी
केलेले रोल नंबर, अॅन्सरशीट व्हॅल्युएशन क्रमांकांना बदलू शकत होते.