आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vyapam Whistlersblowers Clash; 3 Heros, 20 Attack, 69 Threat

व्यापमं व्हिसल ब्लोअर्सच्या संघर्षाची कहाणी; ३ नायक, २० हल्ले, ६९ धमक्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रशांत पांडे । डिजिटल फॉरेन्सिक इंजिनिअर - Divya Marathi
प्रशांत पांडे । डिजिटल फॉरेन्सिक इंजिनिअर
सर्वाधिक चर्चित 'व्यापमं' घोटाळ्याची व्याप्ती डॉ. आनंद राय, आशिष चतुर्वेदी आणि प्रशांत पांडे या ३ व्हिसल ब्लोअरविषयी (जागल्या) जाणून घेतल्याशिवाय कळणारच नाही. व्यापमं घोटाळा जसजसा समोर येत गेला, तशा या तिघांच्या खासगी, सामाजिक व व्यावसायिक जीवनातील अडचणी वाढत गेल्या. त्यांच्या आयुष्याची वाटचाल सध्या तुरुंग, न्यायालय, धमक्या व हल्ल्यांतून होत आहे.
सर्वात दुर्लक्षित पुरावे दिल्यावरही तुरुंगवास, आजी अद्यापही रुग्णालयात

दिव्य मराठी नेटवर्क । नवी दिल्ली / इंदूर
दहा वर्षांचे देदीप्यमान करिअर. मोठमोठ्या गुन्हेगारी प्रकरणांची उकल करण्यात आयबी, पोलिस, एसटीएफसारख्या संस्थांना मदत, अशी ३६ वर्षीय प्रशांत पांडे यांची ओळख आहे. आता व्यापमं घोटाळ्यात धक्कादायक खुलासे करणारे व्हिसल ब्लोअर म्हणून त्यांनी नवी ओळख पुढे आली आहे. एकेदिवशी रात्री पोलिसांनी त्यांना घरातून उचलून नेले, त्याच वेळी त्यांचे जीवन पालटले. त्यांच्याविरुद्ध लोकांची माहिती चोरल्याचा खटला भरण्यात आला. यानंतर जीवघेणा हल्ला झाला. प्रशांत यांच्या मते, आतापर्यंत ५-६ हल्ले व सुमारे ४० वेळेस प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरूपात धमक्या मिळाल्या आहेत. सुरक्षेसाठी न्यायालयास विनंती करावी लागली. या लढाईत माझे करिअर ढासळले आहे. कुटुंबीयांना तणावात राहावे लागत आहे. आजी अद्यापही रुग्णालयात आहे. मात्र, माझ्याकडे यावर इलाज नाही. सिस्टिमविरुद्ध आणि स्वत:साठी लढा देत आहे.

डिजिटल फॉरेन्सिक इंजिनिअर आणि इथिकल हॅकिंग तज्ज्ञ प्रशांत पांडे यांनी टूजी, सफदर नागोरी खटला, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना धमकीचा मेल मिळाल्यासारख्या महत्त्वाच्या प्रकरणांत पोलिसांना मदत केल्याचा त्यांनी दावा केला. वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील घोटाळा उघड झाल्यानंतर जुलै २०१३ पासून प्रशांतही याच्या तपासात जोडले गेले. एसटीएफने व्यापमंचे माजी चीफ सिस्टिम अॅनालिस्ट नितीन मोहिंद्रा यांच्या संगणकाच्या हार्ड डिस्कमधील डाटा प्राप्त करण्यासाठी त्यांची मदत मागितली होती. एसटीएफच्या अतिरिक्त महासंचालकांनी त्यांना फोनवर ओएमआर शीटमध्ये छेडछाड करता येऊ शकते काय, अशी विचारणा केली होती. एखाद्या व्यक्तीचे जुने कॉल डिटेल्स मिळू शकतात काय, असे विचारत तांत्रिक मदत मागितली होती. आपण त्यांचे हे काम करून दिल्यानंतर अनेक प्रकरणे समोर आली. यानंतर या घोटाळ्यातील एक-एक पदर उलगडत गेले.

पुढे वाचा, जगदीश सागर यांची न्यायालयातच धमकी, पत्नीलाही केले निलंबित